आलिया भट आणि शर्वरी वाघच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार शिव रवैल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 07:10 PM2024-02-02T19:10:08+5:302024-02-02T19:10:33+5:30
आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स YRFजासूस विश्वातील पहिला महिल्या गुप्तहेरवर आधारीत चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये आलिया भट आणि बंटी और बबली २ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स YRFजासूस विश्वातील पहिला महिल्या गुप्तहेरवर आधारीत चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये आलिया भट (Alia Bhatt) आणि बंटी और बबली २ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेले नाही. त्याचवेळी, आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी शिव रवैलची निवड केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राने या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड केली आहे. वायआरएफचा पहिला महिला गुप्तहेर चित्रपट द रेल्वे मॅन वेबसीरिजचा दिग्दर्शक शिव रवैल दिग्दर्शित करणार आहे. आदित्य चोप्राने शिव रवैल यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आता दिग्दर्शक या चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू करणार हे अद्याप समजलेले नाही. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
आलिया आणि शर्वरी दिसणार मुख्य भूमिकेत
YRFच्या पहिल्या महिला गुप्तहेर चित्रपटात आलिया भट आणि शर्वरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर शाहरुख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन सारखे सुपरस्टार देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट ॲक्शनने परिपूर्ण असेल. रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि शर्वरी या दोघांनाही त्यांच्या ॲक्शन सीनसाठी तीन महिने कठोर प्रशिक्षण घ्यावे लागणार आहेत. यामध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्सच्या प्रशिक्षणाचाही समावेश असेल.
लवकरच होणार शूटिंगला सुरूवात
आलिया आणि शर्वरीच्या या चित्रपटाचे शूटिंग मे २०२४ च्या सुमारास मुंबईत सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग परदेशातही होणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनमध्ये जाईल. आदित्य चोप्राचा स्पाय युनिव्हर्समधला हा आठवा चित्रपट असेल. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण, टायगर-3, वॉर-2 आणि टायगर व्हर्सेस पठाण नंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.