फायनल सामना हरल्यावर टीम इंडियासाठी शिव ठाकरे म्हणाला, 'टीमने खूप मेहनत घेतली आता फालतुगिरी...'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 05:43 PM2023-11-20T17:43:43+5:302023-11-20T17:47:14+5:30
शिव ठाकरेने भारतीय टीमला पाठिंबा दिला आणि पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे स्टार्स अन् दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्नांचा चुराडा केला. तरीही सर्वजण टीम इंडियाला सपोर्ट करत आहेत. 'आपला माणूस' शिव ठाकरेने भारतीय टीमला पाठिंबा दिला आणि भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिव म्हणाला, 'मी सामना पाहत नाही. मी खूप मोठा चाहता नाही. पण, वर्ल्डकपसाठी मी टीशर्ट आणि फ्लॅग घेतला होता. मी मरीन ड्राईव्हवर जाऊन आनंद साजरा करणार होतो. कारण, आपण सामना जिंकणारच होतो. सामन्याशी संपुर्ण भारत भावनिकरित्या जोडला गेला होता. पण आता आपण टीम इंडियाला साथ द्यायला हवी. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. संपुर्ण टीमने खूप मेहनत घेतली. सामना जिंकल्यावर आपण त्यांच्यासोबत असतो. तर आता हरल्यावरही आपण त्याच्यासोबत असलं पाहिजे. फालतुगिरी नाही पाहिजे'.
शिव ठाकरे सध्या 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. आता 'झलक दिखला जा 11'च्या मंचावर तो काय धमाका करणार याकडेस सर्वांचं लक्ष लागलं आहे.त्याला पडद्यावर नाचताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक गोड भेट ठरणार आहे.
'बिग बॉस मराठी'मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या शिवने अपार मेहतनीच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अत्यंत मेहनतीने शिव ठाकरे हा यशाच्या शिखरावर पोहचला आहे. रिअॅलिटी शोमध्ये असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिववर त्याच्या वागणुकीमुळे कौतुकाचा वर्षाव होत असतो.