शिव ठाकरेने घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन, बाप्पाच्या पायावर डोकं ठेवलं अन्...; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:20 PM2024-09-14T17:20:35+5:302024-09-14T17:20:56+5:30

'बिग बॉस' फेम शिव ठाकरे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनाला, पाहा व्हिडिओ

Shiv Thackeray took blessings of Chintamani of Chinchpokali watch video | शिव ठाकरेने घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन, बाप्पाच्या पायावर डोकं ठेवलं अन्...; पाहा व्हिडिओ

शिव ठाकरेने घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन, बाप्पाच्या पायावर डोकं ठेवलं अन्...; पाहा व्हिडिओ

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. गणरायाच्या आगमनाने वातावरणही प्रफुल्लित झाले आहे. मुंबईतील लालबाग नगरी गणरायाच्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. दरवर्षी लाखो भाविक आपल्या आवडत्या आणि लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. लालबागमधील चिंचपोकळी मंडळाचा चिंतामणी बाप्पादेखील प्रसिद्ध आहे. भाविकांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटीही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात. 

बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरेने नुकतंच चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. चिंतामणीच्या चरणी शिव नतमस्तक झालेला पाहायला मिळाला. शिवबरोबर रॅपर डिनो जेम्सनेदेखील चिंतामणीच्या दर्शनाला आला होता. शिव ठाकरे आणि डिने जेम्सचा व्हिडिओ चिंचपोकळीचा चिंतामणी या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 


दरम्यान, शिवने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. 'रोडीज'मुळे शिव प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर त्याने 'बिग बॉस मराठी २' ची ट्ऱॉफी नावावर केली होती. 'बिग बॉस १६' मध्येही शिव सहभागी झाला होता. या शोचा तो उपविजेता ठरला होता. त्याबरोबरच खतरों के खिलाडीमध्येही त्याने उत्तम खेळी दाखवली होती. 
 

Web Title: Shiv Thackeray took blessings of Chintamani of Chinchpokali watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.