‘सांग तू आहेस का’च्या सीनसाठी शिवानी रांगोळे थिरकली सदाबहार गाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 08:43 PM2021-03-09T20:43:59+5:302021-03-09T20:44:25+5:30
सांग तू आहेस का मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी शिवानीने नृत्य सादर केले.
स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचे उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एका सदाबहार गाण्यावर नृत्य सादर केले.
शिवानी कथ्थक शिकली असली तरी तिची नृत्याची ही आवड काहीशी मागे पडली होती. सांग तू आहेस का मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी तिने नृत्य सादर केले. मालिकेतली तिची सहकलाकार सानिया चौधरीने या खास गाण्याची कोरिओग्राफी केली होती. या गाण्यावर नृत्य करताना अतिशय आनंद झाल्याची भावना शिवानीने व्यक्त केली.
‘सांग तू आहेस का’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वैभवीला जीवानीशी मारल्यानंतर आता सुलक्षणा स्वराज आणि डॉ. वैभवीच्या देखिल जीवावर उठली आहे. या कठीण काळात वैभवी स्वराजचा जीव कसा वाचवणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे हे नाव घराघरांत पोहोचले. त्यानंतर तिनेअनेक मालिकांमध्ये काम केले. शिवानी सध्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी तिने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.