Sania Mirza Shoaib Malik: शोएब मलिकने पत्नीसाठी केली भावनिक पोस्ट, सानिया मिर्झाने दिला एक शब्दाचा रिप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 17:18 IST2023-02-04T17:16:06+5:302023-02-04T17:18:47+5:30
मध्यंतरी सानिया-शोएब यांच्या काही तरी बिनसलं असल्याच्या बातम्या आल्या होत्या

Sania Mirza Shoaib Malik: शोएब मलिकने पत्नीसाठी केली भावनिक पोस्ट, सानिया मिर्झाने दिला एक शब्दाचा रिप्लाय
Sania Mirza Shoaib Malik: Australian Open 2023च्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताची स्टार टेनिसपटूंची जोडी सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. ब्राझीलच्या राफेल मातोस आणि लुएसा स्टेफनी या जोडीने सानिया-रोहन जोडीला दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि विजेतेपदावर नाव कोरले. (Rafael Matos - Luisa Stefani beats Sania Mirza - Rohan Bopanna) त्यांनी ७-६(७-२), ६-२ असा सामना जिंकला. भारतीय जोडीने उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक यांचा ७-६(५) ६-७(५) १०-६ असा पराभव केला होता. सानियाने या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे आधीच जाहीर केले होते, त्यामुळे तिच्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याची तिच्याकडे सुवर्णसंधी होती, पण अखेर तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. या पराभवासह सानिया मिर्झाची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपुष्टात आली. अंतिम सामन्यात सानियाच्या पराभवानंतर तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने एक भावनिक पोस्ट केली.
काय आहे ती भावनिक पोस्ट
शोएब मलिकने ट्विटरवर लिहिले की, 'तू क्रीडा क्षेत्रातील महिलांसाठी आशास्थान आहेस. तू तुझ्या कारकिर्दीत जे काही कमावलं आहेस, त्याबद्दल मला तुझा खूप अभिमान आहे. तू अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस, त्यामुळे तू कायम खंबीर राहा. तुझ्या समृद्ध व अप्रतिम कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन.' शोएब मलिकेच्या भावनिक पोस्टवर सानिया मिर्झानेही उत्तर दिले. सानिया मिर्झाने केवळ लिहिले, 'धन्यवाद'. यासोबतच भारतीय टेनिस स्टारने छानसा चेहऱ्याचा इमोजीही शेअर केला.
Thank you 😊 https://t.co/Di5ZBBWFOb
— Sania Mirza (@MirzaSania) January 29, 2023
ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मधून बाहेर पडल्यानंतर सानिया मिर्झाने भावनिक भाषण केले होते. सानिया म्हणाली होती की, मी जर रडले तर ते आनंदाचे अश्रू आहेत, दु:खाचे नाही. म्हणजेच ती आणखी काही विविध स्तरावरील स्पर्धा खेळणार असल्याचे सानियाने यावेळी नमूद केले.
सानियाच्या नावावर सहा ग्रँडस्लॅम
सानिया मिर्झाने तिच्या सुवर्ण कारकिर्दीत 43 WTA खिताब जिंकले, ज्यामध्ये सहा ग्रँड डबल्स विजेतेपदांचा समावेश आहे. सानियाने दुहेरीत जिंकलेल्या सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदांपैकी तीन मिश्र दुहेरी आणि तितक्याच महिला दुहेरी विजेतेपदे आहेत. सानियाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून शेवटचे ग्रँडस्लॅम मिळवले होते.