Shocking! सुशांत 2013 सालापासून घेत होता ते औषधं, युरोप ट्रिपदरम्यान रियाच्या आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 04:49 PM2020-08-27T16:49:41+5:302020-08-27T16:50:05+5:30
रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच तिच्यावर केलेल्या आरोपांचा खुलासा केला आहे. रियाने युरोप ट्रिपदरम्यान सुशांतच्या काही नवीन गोष्टी समोर आल्याचे सांगितले..
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी कधी ताब्यात घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच तिच्यावर केलेल्या आरोपांचा खुलासा केला आहे. रियाने युरोप ट्रिपबद्दल सांगताना म्हटले की या ट्रिपदरम्यान तिला सुशांतच्या ड्रिपेशनबद्दल समजले होते.
रियाने आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, युरोप ट्रिपला जाताना सुशांतने मला आणि सर्वांना सांगितले की त्याला फ्लाइटमध्ये बसल्यावर खूप क्लोस्ट्रोफोबिया आहे. त्यासाठी तो औषध घेतो. ज्याचे नाव आहे मोडाफिनी आणि त्याच्याजवळ हे औषध नेहमी असायचे. त्याने फ्लाइटमध्ये जाण्याआधी हे औषध स्वतःहून घेतले. त्याला त्यासाठी कोणत्याच प्रीस्क्रिप्शनची घ्यावे नाही लागले कारण त्याच्याकडे ते औषध आधीपासूनच होते.
आम्ही पॅरिसमध्ये उतरलो. तीन दिवस सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर पडलेच नाही. मग आम्ही स्वित्झर्लेंडला गेलो. तिथे सुशांत खूश होता. मग आम्ही इटलीला गेलो. तिथे आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो. हॉटेलचे नाव होते पलाजो मॅग्नेनी फरेनी. हे एक भूताटकी हॉटेल आहे. हे आम्हाला बुकिंगच्या आधी माहित नव्हते. आमच्या खोलीत विचित्र असे डोंबसारखे स्ट्रक्चर होते आणि त्यात चित्र विचित्र फोटो होते. मला भीती वाटली. पण सुशांत म्हणाला ठीक आहे. सुशांत त्या रात्री झोपू शकला नाही. त्याने त्याला भीती वाटत असल्याचे सांगितले. मग मी त्याला इथून चेकआऊट करूयात असे म्हटले त्यावर तो नको म्हणाला.
रिया पुढे म्हणाली की, त्यानंतर त्यांची तब्येत खराब होऊ लागली. तो खोलीतून बाहेर पडत नव्हता संपूर्ण ट्रीपदरम्यान. मी त्याच्याशी बोलले आणि त्याने मला सांगितले की 2013मध्ये त्याच्यासोबत असेच झाले होते जेव्हा त्याला डिप्रेसिव एपिसोड झाला होता. तेव्हा तो एका सायकॅट्रिस्टकडे गेला होता कदाचित त्यांचे नाव मिस्टर हरेश शेट्टी आहे आणि त्यांनी सुशांतला ही मोडाफिनी हे औषध दिले होते. सायकॅट्रिस्टला भेटल्यानंतर तो बरा झाला होता. मध्ये-मध्ये त्याला कित्येकदा एंग्जाइटी अटॅक येत होते. पण आता तो खूप जास्त डिप्रेस आणि चिंतेत रहायला लागला होता. मग आम्ही ही ट्रिप थांबवली आणि परत आलो.