‘शोले’तील ‘सांभा’च्या मुली अचानक आल्या चर्चेत; हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 01:11 PM2019-05-17T13:11:41+5:302019-05-17T13:14:53+5:30
अरे ओ सांभा, कितने आदमी थे? हा ‘शोले’तील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. हा डायलॉग म्हणायला अमजद खान यांना तब्बल 40 रिटेक घ्यावे लागल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे, सांभा.
अरे ओ सांभा, कितने आदमी थे? हा ‘शोले’तील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. हा डायलॉग म्हणायला अमजद खान यांना तब्बल 40 रिटेक घ्यावे लागल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे, सांभा. होय, ‘शोले’त सांभाची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन माकिजानी उर्फ मॅक मोहन यांच्या मुलीबद्दल एक फक्कड बातमी आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मोहन यांना दोन मुली आहेत. मंजरी आणि विनती अशी त्यांची नावे. तर आता मंजरी व विनती या दोघीही बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहेत. मंजरी आणि विनती या दोघींनी मिळून देशातील पहिला स्केटबोर्डिंगवर आधारित चित्रपट बनण्याचा निर्णय घेतला आहे.
लेखिका आणि दिग्दर्शिका अशी ओळख असलेल्या मंजरी माकिजानी ही मोहन यांची मोठी मुलगी आहे. यापूर्वी दिग्गज दिग्दर्शकांसोबत तिने काम केले आहे. क्रिस्टोफर नोलन आणि पेंटी जेंकिंस यांचा यात समावेश आहे. यांच्यासोबत मंजरीने डंकर्क, द डार्क नाइट राइजेस आणि वंडर वूमेन आदी चित्रपटांसाठी काम केले. याशिवाय टॉम क्रूजच्या मिशन इम्पॉसिबल गोस्ट प्रोटोकॉल, वेक अप सिड आणि विशाल भारद्वाज यांच्या सात खून माफ या चित्रपटातही तिचे योगदान आहे.
तीन शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्यानंतर एक दिग्दर्शिका म्हणून नावारूपास आलेली मंजरी आता आपल्या बहीणीसोबत म्हणजेच विनतीसोबत बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट दिग्दशिृत करणार आहे. विनती हा चित्रपट प्रोड्यूस करतेय.
‘डेजर्ट डॉलफिन’ नामक या चित्रपटात यात राजस्थानच्या एका गावात राहणा-या प्रेरणा नामक मुलीची कथा रेखाटण्यात येणार आहे. ही मुलगी ३४ वर्षांची ग्राफिक आर्टिस्ट जेसिकाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून स्केटबोर्डिंग करण्याचे स्वप्न पाहते. तूर्तास या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु आहे. उदयपूरच्या खेमपूर गावात यासाठी स्केटिंग एरिया बनवण्यात आला आहे.
मंजरीने सांगितले की, मध्यप्रदेशच्या एका गावावर बनलेली स्केटबोर्डिंगची डॉक्युमेंट्री पाहून मी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.