शूटिंगला चीनमध्ये परवानगी नाही
By Admin | Published: February 10, 2016 01:51 AM2016-02-10T01:51:55+5:302016-02-10T01:51:55+5:30
जॉ न अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘फोर्स २’ला जास्त वास्तववादी करण्यासाठी काही अॅक्शन सीन्स खऱ्या लोकेशन्सवर शूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकतीच निर्मात्यांनी
जॉ न अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर ‘फोर्स २’ला जास्त वास्तववादी करण्यासाठी काही अॅक्शन सीन्स खऱ्या लोकेशन्सवर शूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नुकतीच निर्मात्यांनी चीन सरकारकडे शूटिंग करण्याची परवानगी मागितली. परंतु, चीन सरकारने शूटिंग करण्यास मनाई केली आहे. चित्रपटाची कथा ही फारच संवेदनशील आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुडापेस्ट येथे चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर संपूर्ण टीम चीनला रवाना होण्यासाठी तयार होती. सर्व तयारी जवळपास झालीच होती. परंतु चिनी सरकारने पूर्णपणे तिथे शूटिंग करण्यास मनाई केली. चित्रपटाची कथा भारत आणि इतर काही देशांत शूटिंग करण्यात येणार आहे. यात रॉ आणि चीनच्या काही गुप्तहेर संघटनांना दाखवण्यात आले आहे.