‘शॉर्टकट’मध्ये संस्कृती ग्लॅमरस भूमिकेत

By Admin | Published: August 6, 2015 12:21 AM2015-08-06T00:21:48+5:302015-08-06T00:21:48+5:30

‘पिंजरा’ मालिकेतील साध्याभोळ्या आनंदीने म्हणजेच संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. त्यानंतरही ती पडद्यावरही साध्याच रूपात दिसली

In the 'Shortcut' culture the role of glamorous role | ‘शॉर्टकट’मध्ये संस्कृती ग्लॅमरस भूमिकेत

‘शॉर्टकट’मध्ये संस्कृती ग्लॅमरस भूमिकेत

googlenewsNext

‘पिंजरा’ मालिकेतील साध्याभोळ्या आनंदीने म्हणजेच संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. त्यानंतरही ती पडद्यावरही साध्याच रूपात दिसली. ही आनंदी आता ‘शॉर्टकट - दिसतो पण नसतो’ चित्रपटात ओळ्खूही येणार येणार नाही अशा ग्लॅमरस रूपात दिसतेय. चित्रपटाची पहिली झलक समोर आली आणि संस्कृतीचा फॅशनेबल, हॉट लूक चर्चेचा विषय झाला. याबाबत संस्कृती म्हणते, ‘‘ग्लॅमरस दिसायला खरंच मेहनत घ्यावी लागते. मी याआधी अगदी गावंढळ म्हणावे असे आणि साधेसुधे रोल केले आहेत. त्या वेळी एखादा केस इकडचा तिकडे झाला तरी फरक पडायचा नाही. खरं तर मला ते आवडायचंही.. मात्र, ‘शॉर्टकट’साठी शूट करताना माझा हेअर ड्रेसर आला, की मी टाळाटाळ करायचे. पण दिग्दर्शकाचंही माझ्या या गोष्टींकडे खूप लक्ष होतं. त्यामुळे मला त्याची सवय करून घ्यावी लागली. हे असलं तरीही कुठंही फॅशन व्हल्गॅरिटीकडे वळायला नको, याची काळजी दिग्दर्शकानं आणि मीही घेतली. सुरुवातीला खरं तर मला या कपड्यात काम करायला जरा अवघडल्यासारखं झालं; पण आता जेव्हा इंडस्ट्रीतून, माझ्या फॅन्सकडून चांगली प्रतिक्रिया मिळतेय तेव्हा चांगलं वाटतंय. शॉर्टकटमधील ईशिका म्हणजे मीच.. हो, इतकं साम्य आमच्या राहण्यात, वागण्या-बोलण्यात आहे. आमचा डे्रसिंग सेन्सही सारखा आहे. ईशिका एक बबली, लगेच बोलणारी, उद्धट, कॉन्फिडंट, स्टे्रट फॉरवर्ड अशी आहे. या चित्रपटानं माझा एक नवीन लूक, अँगल लोकांना पाहायला मिळणार म्हणून हा चित्रपट खूप स्पेशल आहे. माझी भूमिका, हा चित्रपट लोकांना नक्कीच आवडणार असल्यानं मी प्रचंड एक्साइटेड आहे.’’ - मधुवंती आचार्य

Web Title: In the 'Shortcut' culture the role of glamorous role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.