श्रेयस तळपदेच्या लेकीचा पाहा फोटो, भावनिक पोस्टसह शेअर केली लेकीची पहिली झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:29 PM2018-06-28T15:29:30+5:302018-06-28T15:31:31+5:30

दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.

Shreyas talpade Share Her Daughters Photo first time with Emotional post | श्रेयस तळपदेच्या लेकीचा पाहा फोटो, भावनिक पोस्टसह शेअर केली लेकीची पहिली झलक

श्रेयस तळपदेच्या लेकीचा पाहा फोटो, भावनिक पोस्टसह शेअर केली लेकीची पहिली झलक

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. श्रेयसनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. श्रेयसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेकीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. श्रेयस त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आठवडाभर घरापासून काही वेळ दूर जाणार आहे. त्यामुळे तुला भेटण्यासाठी लवकरच परत येईल अशी भावनिक पोस्ट श्रेयसने या फोटोसह शेअर केली. श्रेयसने शेअर केलेल्या या फोटोला फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून एका चिमुकलीचे आगमन झालं आहे. श्रेयस आणि दीप्ती हे १३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. मे महिन्याच्या अखेरीस हे दोघेही फिरायला निघाले होते. विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या मुलीला सरोगसीच्या मदतीने जन्म देणार्‍या मातेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे हॉलिडे प्लॅन रद्द करून ते परतले. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.

कॉलेजमधील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्याचे निमित्त ठरलं आणि दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.त्यावेळी श्रेयसला दीप्ती पाहताक्षणी आवडली तर दीप्तीला श्रेयसचा साधेपणा भावला.दोघांचं प्रेम खुलू लागलं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले.लग्नाच्या तेरा वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.दीप्ती खंबीरपणे श्रेयसच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते,त्याला पाठिंबा देते. दुसरीकडे श्रेयसही आपल्या सगळ्या यशाचे श्रेय दीप्तीलाच देतो.दुसरीकडे दीप्तीसुद्धा श्रेयसचं कौतुक करताना थकत नाही.दोघांमध्ये कितीही भांडणं झाली तरी काही क्षणात ते विसरतो असं ती सांगते.कितीही कडाक्याचे भांडण झालं तरी नव्या दिवसाची सुरुवात गोड बोलून करतो आणि तेच आपल्या यशस्वी नात्याचे गमक आहे असं हे रोमँटिक कपल सांगते.

Web Title: Shreyas talpade Share Her Daughters Photo first time with Emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.