श्रेयस का राज खुल गया

By Admin | Published: April 4, 2016 01:43 AM2016-04-04T01:43:09+5:302016-04-04T01:43:09+5:30

का ही दिवसांपूर्वी आपला हँडसम हंक श्रेयस तळपदे एका मुलीसाठी ‘परदे में रहने दो.. परदा ना हटाओ’ हे गाणं गात होता, असं आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं.

Shreyas's reign opened | श्रेयस का राज खुल गया

श्रेयस का राज खुल गया

googlenewsNext

का ही दिवसांपूर्वी आपला हँडसम हंक श्रेयस तळपदे एका मुलीसाठी ‘परदे में रहने दो.. परदा ना हटाओ’ हे गाणं गात होता, असं आम्हीच तुम्हाला सांगितलं होतं. परंतु, आता या मुलीच्या चेहऱ्यावरचा पडदा हटला असून सर्वांसमोर श्रेयसचा राज खुलले आहे. परची चित्रपटाच्या सेटवर श्रेयस अन् त्याच्या या मिस्ट्री गर्लचा फोटो नुकताच त्यांनी सोशल साईटवर अपलोड केला आहे. श्रेयसची ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण आहे? त्याच्या चित्रपटातील नवी हिरोईन आहे का? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेच असतील ना. तर, या मिस्ट्री गर्लचं नाव आहे ग्लाफिरा. तिच्या लूक अन् नावावरून तरी असेच वाटते, की आणखी एका परदेशी हिरोईनला परचीमधून आपल्याला वेलकम करावे लागणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या मनालीमध्ये सुरू असून श्रेयस म्हणतोय, ‘‘द टेम्प्रेचर आॅफ मनाली जस्ट वेंट अप अ फिव नोचेस... विथ द सेक्सी ग्लाफिरा आॅन द सेट्स आॅफ परची.’’ श्रेयसचा मनालीच्या अ‍ॅटमॉस्फिअरमधील हा रोमँटिक मूड पाहता, नक्कीच ग्लाफिराची कंपनी तो एन्जॉय करतोय, असं म्हणायला काही हरकत नाही.

Web Title: Shreyas's reign opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.