Shruti Hassan : कमल हसन यांची लेक तणावात ? श्रुतीनेच ट्वीट करत केला खुलासा, सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 07:20 PM2023-01-14T19:20:18+5:302023-01-14T19:25:01+5:30
हैदराबादच्या एका इव्हेंटमध्ये श्रुती हसन कॅमेऱ्यासमोर आलीच नाही. यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली.
Shruti Hassan : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन आगामी 'वॉल्टर वीरैय्या' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये सुपरस्टार चिरंजीवी मुख्य भुमिकेत आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलर लॉंच सोहळा हैदराबाद येथे पार पडला. या इव्हेंटमध्ये श्रुती हसन कॅमेऱ्यासमोर आलीच नाही. यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली. श्रुती हसन तणावात आहे, ती मानसिक आजाराशी झुंज देत आहे असे कमेंट्स येऊ लागले. आता यावर श्रुतीने स्वत:च मौन सोडले आहे.
सोशल मीडियावर बोलल्या जाणाऱ्या उलटसुलट चर्चांवर श्रुती हसनने ट्विट केले आहे. तिने सर्व कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देत तिने लिहिले,'चांगला प्रयत्न आहे. तुमचे आभार मात्र मी व्हायरल फिव्हरमधून बरी होत आहे.' अशा आशयाचे ट्वीट तिने केले आहे.
Nice try !! And Thankyou I’m recovering well from my viral fever pic.twitter.com/oxTYevcK1D
— shruti haasan (@shrutihaasan) January 12, 2023
हे ट्वीट करत तिने टीकाकारांची बोलतीच बंद केली आहे. श्रुती बॉलिवूड सिनेमांमधून गायबच आहे मात्र ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अधूनमधून दिसत असते. तसेच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही फार चर्चेत असते. श्रुती अनेकदा तिचा बॉयफ्रेंड शंतनु हजारिका सह दिसली आहे. दोघांचे हातात हात घालून पार्टी किंवा एकत्र फिरतानाचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात.
Lovebirds #ShrutiHaasan and #SantanuHazarika were twinning in black as they stepped out to shop for some essentials in the city!📸❤️ pic.twitter.com/SpWThiCkhw
— Pinkvilla South (@PinkvillaSouth) January 13, 2023