अंगूरी भाभीने 'कान्हा सो जरा...' गाण्यावर लावले ठुमके, सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 03:34 PM2019-04-03T15:34:37+5:302019-04-03T15:35:39+5:30
उत्तम अभिनेत्रींसह ती एक चांगली नृत्यांगणा देखील असल्याचे या व्हिडीओमुळे स्पष्ट होते.
कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. तर कुणाला डान्सचा. असाच काहीसा छंद 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रेलाही आहे. शुभांगी अत्रेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत शुभांगी 'कान्हा सो जरा...' गाण्यावर ठुमके लावताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. शूटिंगमधून मिळालेल्या वेळेतून शुभांगी अशा प्रकारे आपली कला जोपसण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. तिने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. शुभांगीने स्वतः हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या हा व्हिडीओ पाहून तिला खूप सा-या कमेंटस् आणि लाईक्सचा मिळत आहेत. उत्तम अभिनेत्रींसह ती एक चांगली नृत्यांगणा देखील असल्याचे या व्हिडीओमुळे स्पष्ट होते.
तसेच दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. याच प्रेमामुळेच आनंदी, हसतमुख असून मिळणारं सगळं यश हे फॅन्सचे असल्याचे तिने नमूद केले आहे.