82 वर्षांचा झाला ‘श्यामची आई’ चित्रपटातला ‘श्याम’, जाणून घ्या सध्या काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 08:00 AM2021-10-24T08:00:00+5:302021-10-24T08:00:02+5:30

1953 साली प्रदर्शित झालेला ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) हा सिनेमा आजच्या पिढीला आठवण्याचं कारणं नाही. पण ज्यांनी तो पाहिलायं, त्यांना या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई हे दोन चेहरे विसरणं शक्य नाही.

Shyamchi Aai shyam aka madhav vaze turned 82 years old, know about actor | 82 वर्षांचा झाला ‘श्यामची आई’ चित्रपटातला ‘श्याम’, जाणून घ्या सध्या काय करतात?

82 वर्षांचा झाला ‘श्यामची आई’ चित्रपटातला ‘श्याम’, जाणून घ्या सध्या काय करतात?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘श्यामची आई’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे उत्तम नट आहेत आणि त्यांचा रंगभूमीचा अभ्यासदेखील दांडगा आहे.

1953 साली प्रदर्शित झालेला ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) हा सिनेमा आजच्या पिढीला आठवण्याचं कारणं नाही. पण ज्यांनी तो पाहिलायं, त्यांना या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई हे दोन चेहरे विसरणं शक्य नाही. अभिनेत्री वनमाला, दामू अण्णा जोशी, सुमती गुप्ते, बाबुराव पेंढारकर अशा मातब्बर कलाकारांच्या अभिनयानं सजलेला हा सिनेमा म्हणजे, एक महान कलाकृती. या चित्रपटाचा श्याम म्हणजे अभिनेते माधव वझे (Madhav Vaze). आज हा चिमुकला ‘श्याम ’ 82 वर्षांचा झाला आहे.

आचार्य अत्रे यांनी  साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर चित्रपट बनवायचा निर्णय घेतला. श्यामची आई म्हणुन ज्येष्ठ अभिनेत्री वनमाला यांची निवड झाली. चित्रीकरण सुरू झालं आणि चिमुकला श्यामही सेटवर आला. पण  वनमालाबार्इंना तो मुलगा श्याम म्हणून काही पसंत पडला नाही. वनमाला यांनी तसं स्पष्टचं सांगितलं आणि चित्रीकरण थांबलं. मग काय, नव्या श्यामचा शोध सुरू झाला. याचदरम्यान  आचार्य अत्र्यांना कुणीतरी  माधव वझे या मुलाचं नाव सुचवलं. अत्रे थेट माधवच्या घरी गेले. त्यांना चिमुकला माधव पाहताक्षणी आवडला आणि वनमाला यांना तर चुणचुणीत श्याम त्यांच्यापेक्षाही अधिक आवडला. 

मुंबई आणि कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण व्यवस्थित पार पडलं. तुम्हाला माहित नसावं पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आचार्य अत्र्यांनी श्यामला म्हणजेच माधवला हत्तीवर बसवुन मुंबईतील दादर भागात साखर वाटली होती.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माधव वझे यांचे वय होते अवघे 14 वर्षे. परंतु त्यांची त्यावेळची अभिनयातील समज वाखाणण्यासारखी होती. माधव वझे यांचे आज वय 82 वर्षे इतकं आहे. ते सध्या पुण्यात राहतात.  श्यामची आई, आचार्य अत्रे आणि मी  ही त्यांची पुस्तक प्रसिद्ध आहे. आपल्या मनोगतात ते म्हणतात, ‘श्यामची आई या चित्रपटाच्या निमित्ताने मी तुमच्या (म्हणजे अत्रे साहेबांच्या) सहवासात आलो आणि तिथे सगळे म्हणत होते, त्याप्रमाणे मीही तुम्हाला साहेब म्हणायला लागलो. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या आणि त्यानंतरच्या वर्ष-सहा महिन्यांच्या काळातले साहेब किती लोभस होते, हे फक्त माझं मलाच माहीत आहे. अत्र्यांनी तुला काय दिलं ? म्हणजे किती पैसे वगैरे-असा प्रश्न विचारणारे विचारतातच. तेव्हा क्षणभराचाही विचार न करता मी सांगतो. आचार्य अत्रे यांनी मला माधव वझे ही ओळख दिली !’

‘श्यामची आई’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेले माधव वझे हे उत्तम नट आहेत आणि त्यांचा रंगभूमीचा अभ्यासदेखील दांडगा आहे. पुण्याच्या वाडिया कॉलेजमधून ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. नाटककार परशुराम देशपांडे यांनी शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते.

  3 इडियट्स या चित्रपटात केलं काम
 3 इडियट्स या हिंदी चित्रपटात माधव वझे यांनी एक भूमिका साकारली आहे.  या चित्रपटात आत्महत्या करत असलेला जॉय लोबो तुम्हाला आठवतो का? याच जॉयच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसले होते.  काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आलिया भट आणि शाहरुख खानच्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात त्यांनी आलियाच्या आजोबांच्या भूमिकेत दिसले होते. 

Web Title: Shyamchi Aai shyam aka madhav vaze turned 82 years old, know about actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.