वडिलांमुळे रातोरात रस्त्यावर आले 'हे' भाऊ-बहीण; अचानक एका चित्रपटाने चमकलं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 03:49 PM2024-01-13T15:49:30+5:302024-01-13T15:51:11+5:30
वडील डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि एक्टर म्हणून काम करत होते. एकदा त्यांनी एक चित्रपट बनवला जो अत्यंत फ्लॉप झाला आणि रातोरात ते सर्वजण रस्त्यावर आले.
बॉलिवूडची प्रसिद्ध डायरेक्टर-कोरियोग्राफर फराह खानने 9 जानेवारीला तिचा 59 वा वाढदिवस साजरा केला. मैं हूं ना आणि ओम शांती ओम यांसारख्या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या फराहने आज अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. डायरेक्टर आणि कोरियोग्राफीच्या क्षेत्रात ती खूप लोकप्रिय झाली आहे. मात्र फराह खानचा हा प्रवास सोपा नव्हता. तिला यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे.
फराहचा जन्म 1965 साली झाला. तिचे वडील कामरान खान आणि आई मेनका इराणी पारशी कुटुंबातील होती. वडील स्टंटमॅनवरून फिल्ममेकर बनले होते. फराह खान आणि साजिद खान हे लहान असतानाच त्यांचे आई-वडील वेगळे झाले. साजिद खानने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली तर फराहने बॅकग्राउंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर मागे वळून पाहिले नाही. आज ते दोघंही यशस्वी आहेत.
मायकेल जॅक्सनचा प्रभाव
एका मुलाखतीत फराहने सांगितले होतं की, मायकल जॅक्सनचा 'थ्रिलर' अल्बम पाहिल्यानंतर तिने नृत्याची निवड करिअर म्हणून केली होती. यानंतर नृत्य हेच तिचं जग बनलं आणि तिने नृत्यात पारंगत होऊन स्वतःचा डान्स ग्रुप तयार केला. मात्र, करिअर म्हणून हा मार्ग निवडणं सोपं नव्हतं. बालपणी अत्यंत गरिबीत तिने आयुष्य काढलं होतं.
एका रात्रीत फराहचे वडील झाले गरीब
फराह 5 वर्षांची होईपर्यंत तिचं बालपण खूप चांगलं होतं. त्यावेळी तिचे वडील डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि एक्टर म्हणून काम करत होते. एकदा त्यांनी एक चित्रपट बनवला जो अत्यंत फ्लॉप झाला आणि रातोरात ते सर्वजण रस्त्यावर आले. तो काळ संपूर्ण कुटुंबासाठी खूप अडचणींचा होता.
असा मिळाला पहिला चित्रपट
1992 मध्ये 'जो जीता वही सिकंदर' या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यासाठी कोरिओग्राफरचा शोध सुरू होता. यासाठी सरोज खान यांची समजूत घातली जात होती मात्र त्या डेट्स देऊ शकल्या नाहीत. शेवटी या चित्रपटातील गाण्यांच्या कोरिओग्राफीची जबाबदारी फराह खानला देण्यात आली आणि त्यानंतर ती सुपरहिट ठरली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.