‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिस गाजवतोय, पहिल्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 09:05 AM2023-11-28T09:05:40+5:302023-11-28T09:10:28+5:30

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.

Siddharth chandekar marathi movie jhimma 2 first three days box office collection | ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिस गाजवतोय, पहिल्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिस गाजवतोय, पहिल्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

सध्या जिकडेतिकडे 'झिम्मा २' या मराठी चित्रपटाची चर्चा आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा' सिनेमाचा हा सीक्वेल आहे. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या 'झिम्मा २'च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. अखेर शुक्रवारी(२४ नोव्हेंबर) हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. झिम्मा २ प्रदर्शित होण्याआधीच त्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत होती. सध्या हा सिनेमा चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. 

चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे. कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Web Title: Siddharth chandekar marathi movie jhimma 2 first three days box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.