सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

By तेजल गावडे | Published: September 3, 2021 07:15 PM2021-09-03T19:15:56+5:302021-09-03T19:16:22+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची नुकतीच 'अधांतरी' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Siddharth Chandekar says, '... this time will never be forgotten' | सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची नुकतीच 'अधांतरी' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'अधांतरी' वेबसीरिजची कथा सांग?
- 'अधांतरी'ची कथा अगदी सिम्पल तशी अगदी कॉम्प्लेक्स आहे. लॉंग डिस्टन्समध्ये असलेले कपल जे महिन्यातून दोनदा किंवा जास्तीत जास्त तिनदा भेटत असतात, त्यांच्यावर आधारीत या सीरिजची कथा आहे. हे कपल एक विकेंड शनिवार रविवारी कुठल्यातरी कॉमन ठिकाणी भेटायचे. एकत्र राहायचे, गप्पा मारायचे आणि आपापल्या मार्गाने निघून जायचे. त्यांचे हे रुटीन झालेले होते. आठ महिने झाले, त्यांचे रिलेशनशीप हे असेच चालू असते. एकदा ते विकेंडपुरते भेटतात. लोणावळ्यात आल्यानंतर त्यांना उशीरा समजते की लॉकडाउन झाले आहे. त्यांना निघता येत नाही. आता ते कपल आजपर्यंत कधीच एकत्र राहिलेले नाही आहे ते २१ दिवस एकत्र राहणार आहेत. या दिवसात जेव्हा ते एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांवर लादतात, तेव्हा काय घडते हे या सीरिजमध्ये पहायला मिळणार आहे.

या सीरिजमध्ये तुझ्यासोबत पर्ण पेठे मुख्य भूमिकेत आहे, तिच्याबद्दल काय सांगशील?
- पर्ण ही फारच अप्रतिम अभिनेत्री आहे. यासोबतच ती चांगली व्यक्तीदेखील आहे. तिच्यासोबत काम करताना सकारात्मक ऊर्जा मिळते. तेवढाच वेडेपणादेखील एन्जॉय करायला मिळतो. ती कामाच्या बाबतीत खूप स्ट्रीक्ट आणि फोकस आहे. तिच्यासोबत काम करायला खूप मजा येते. खरेतर आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो. कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतो. ती फर्ग्युसनला होती मी एस पी कॉलेजला होतो. आमची एकमेकांसोबत कधीतरी काम करण्याची इच्छा होती. पण ते जुळून येत नव्हते पण ते अधांतरीच्या निमित्ताने जुळून आले. आता आमची चांगली मैत्री झाली आहे.

या सीरिजचा अनुभव कसा होता?
- पहिले अनलॉक झाले जुलै महिन्याच्या शेवटी त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यात या वेबसीरिजचे शूटिंग केले. तेव्हा शूटिंगसाठी खूप निर्बंध होते. त्यावेळी आम्ही कमीत कमी क्रू सोबत अत्यंत कमी दिवसात या सीरिजचे शूटिंग केले. हा एक वेगळा अनुभव होता.

सध्या तू एकापेक्षा जास्त प्रोजेक्टवर काम करत आहेस, तर याबद्दल काय सांगशील?
- मला बिझी रहायला खूप आवडते. बिझी राहिल्यानंतर रात्री जेव्हा थकून भागून घरी जातो तेव्हा वेगळी मजा येते. खूप छान झोप लागते. खूप बिझी राहिल्यानंतर जेव्हा मोकळे दिवस मिळतात तेव्हा त्यासाठी आपण लायक आहोत, याची जाणीव होते.

लॉकडाउनमध्ये तू आणि मितालीने कसा वेळ व्यतित केला?
मी जवळपास जंगलात राहतो. माझ्या घराच्या खिडकीतून थेट जंगल दिसते. लॉकडाउनमध्ये याच जंगलाने मला आणि मितालीला शांत ठेवले आहे. हा लॉकडाउनचा काळ कसा घालवायचा हे काय प्री प्लान नव्हते. कारण कुणाच्याच आयुष्यात यापूर्वी असे घडलेले नव्हते. या काळात सगळे गोंधळलेले होते. खूप खायचे की कमी खायचे. किती दिवस डाएट करायचे आहे की किती दिवस व्यायाम करायचा हे समजत नव्हते. हे सगळ्यांसाठी नवीन होते. हे सर्व नशीबावर सोडलेले होते. आम्ही सकाळी सकाळी व्यायाम करायचो. कधी तरी पहाटे पर्यंत जगायचो मग सहा सातला झोपायचो. नाश्ता स्कीप करायचो दुपारचे जेवण मग रात्रीचे जेवण करायचो. खरेतर खूप मजा आली. काळजीपूर्वक हा लॉकडाउन घालवला. यासोबत खूप एन्जॉय केला. मध्ये मध्ये टेन्शन, चीड चीड, फस्ट्रेशन हे सगळे होते. पण हा काळ कधीच विसरू शकणार नाही.


आगामी प्रोजेक्टबद्दल सांग?
- अधांतरी ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. झिम्मा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. एका हिंदी वेबसीरिजमध्ये मी काम करतो आहे. ज्याचे शूटिंग आता सुरू आहे. आतापर्यंत न पाहिलेल्या भूमिकेत मी या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या भूमिकेमुळे मी खूप उत्सुक आहे.

हिंदी चित्रपटात काम करायला आवडेल का?
- नक्कीच. बॉलिवूडमध्ये ऑफर येतात पण ते जुळून येत नाही. बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळाली तर नक्की करेन. मी मराठीत मी खूप खू श आहे. पण हिंदीत चांगले काम मिळाले तर नक्कीच करायला आवडेल.  

Web Title: Siddharth Chandekar says, '... this time will never be forgotten'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.