Mitali mayekar Birthday : माझ्याकडे तेवढंच आहे...., सिद्धार्थ चांदेकरची बायको मितालीसाठी रोमॅन्टिक बर्थ डे पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 02:32 PM2022-09-11T14:32:57+5:302022-09-11T14:33:32+5:30
Sidharth Chandekar, Mitali mayekar : सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवशी तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोबत सुंदर शब्दांत सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या आहेत...
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर ( Sidharth Chandekar ) सोशल मीडियावर धम्माल पोस्ट शेअर करत असतो. सध्या त्याची एक ताजी पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. होय, या पोस्टमध्ये सिद्धार्थने बायको मिताली मयेकर (Mitali mayekar) हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची मोजक्या शब्दांतील पण तितकीच बोलकी पोस्ट खूप सांगणारी आहे.
सिद्धार्थने मितालीच्या वाढदिवशी तिच्यासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सोबत सुंदर शब्दांतील सुंदर भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. ‘तुझं हसणं आणि तुझा आनंद इतकंच मला हवंय, माझ्याकडे तेवढंच आहे,’ अशा शब्दांत सिद्धार्थने मितालीबद्दलच्या भावना मांडल्या आहेत.
सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी इंडस्ट्रीतलं क्युट कपल आहे. चाहत्यांचं हे लाडकं कपल एकमेकांवर जीवापाड प्रेम करतं. सोशल मीडियावर दोघं अनेकदा एकमेकांची मस्करी करणारे, टिंगल करणारे व्हिडीओ शेअर करतात. पण दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल अपार आदर आहे.
दोन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर सिद्धार्थ आणि मिताली यांनी जानेवारी 2021 ला पुण्यातील ढेपेवाडा इथं शाही पारंपरिक पध्दतीनं लग्न केलं. 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडीनं प्रेमाची कबुली दिली होती. ‘गुलाबजाम’ हा सिद्धार्थचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र,या चित्रपटापेक्षा जास्त सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अखरे अनेक दिवस सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली होती. सिद्धार्थ आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनी आपल्या नात्याला दुजोरा देत त्यांच्या चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’चं गिफ्ट दिलं होतं.
मिताली मयेकर हिच्याबद्दल सांगायचं तर ती मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या सिनेमात पहिल्यांदा काम केलं. यानंतर असंभव, अनुबंध, भाग्यलक्ष्मी, उंच माझा झोका आणि तू माझा सांगाती अशा मराठी मालिकांमधून सहायक अभिनेत्रीची भूमिका वठवली. उर्फी या सिनेमातून तिने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं. 2016 मध्ये आलेल्या ‘फ्रेशर्स’ या मालिकेत तिने सायली बनकर नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रचंड गाजली होती.