साखरपुडा तुटल्यानंतर प्रियंका चोप्राचा भाऊ करतोय या अभिनेत्रीला डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 06:09 PM2019-09-03T18:09:36+5:302019-09-03T18:24:38+5:30

अंबानींच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धार्थ गेला असता त्याच्यासोबत या अभिनेत्रीला पाहाण्यात आले.

Siddharth Chopra, Priyanka's Brother Spotted With Mystery Lady At Antilia After Calling Off Wedding | साखरपुडा तुटल्यानंतर प्रियंका चोप्राचा भाऊ करतोय या अभिनेत्रीला डेट?

साखरपुडा तुटल्यानंतर प्रियंका चोप्राचा भाऊ करतोय या अभिनेत्रीला डेट?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ सोबत दिसलेली मुलगी ही नीलम उपाध्याय असून तिने मिस्टर सेवन, ॲक्शन थ्री डी, उन्नूडू ओरू नाल, ओम शांती ओम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रियंका चोप्राच्या भावाने देखील अंबानी यांच्या घरी हजेरी लावली. पण त्यावेळी सिद्धार्थसोबत एका मुलीला पाहाण्यात आले. या मुलीसोबतचा फोटो  सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर देखील पोस्ट केला असून तिला टॅग देखील केले आहे. ही मुलगी कोण अशी चर्चा कालपासून रंगली होती.  ही मुलगी दुसरी कोणी नसून एक अभिनेत्री आहे आणि तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ सोबत दिसलेली मुलगी ही नीलम उपाध्याय असून तिने मिस्टर सेवन, ॲक्शन थ्री डी, उन्नूडू ओरू नाल, ओम शांती ओम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिद्धार्थ आणि नीलम यांनी अंबानी यांच्या घरी एकत्र उपस्थिती का लावली असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत का अशी देखील चर्चा सध्या रंगली आहे.

नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटात तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. 

काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थचे लग्न मोडले असल्याने त्याच्यासोबत नीलमला पाहून आता नव्या चर्चांना ऊत आले आहे. इशिता कुमार हिच्यासोबत सिद्धार्थचे लग्न काही महिन्यांपूर्वी होणार होते. पण ऐनवेळी इशिताच्या सर्जरीमुळे हे लग्न पुढे ढकण्यात आले होते. यानंतर अचानक प्रियंकाने तिच्या होणाऱ्या वहिनीला म्हणजे इशिताला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. इशितानेही आपल्या सोशल अकाऊंटवरचे सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले होते, तेव्हाच सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पुढे हे लग्न तुटल्याची बातमी आली. प्रियंका आणि सिद्धार्थची आई मधु चोप्रा यांनीही या वृत्ताला दिला होता. लग्नाबद्दल घाई करणे योग्य नाही, असे त्यावेळी त्यांनी सांगितले होते.  

Web Title: Siddharth Chopra, Priyanka's Brother Spotted With Mystery Lady At Antilia After Calling Off Wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.