'कियाराची सिद्धार्थवर काळी जादू..'; नावाखाली चाहत्याला ५० लाखांना गंडवलं, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:46 PM2024-07-03T13:46:43+5:302024-07-03T13:48:31+5:30
कियारा अडवाणीपासून सिद्धार्थला धोका आहे असा खोटा बनाव आखत एका फॅनला लाखोंचा फटका बसल्याची घटना उघडकीस आलीय. काय घडलंय नेमकं जाणून घेण्यासाठी क्लिक करा बातमीवर (kiara advani, siddharth malhotra)
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल. सिद्धार्थ-कियाराची जोडी लोकांची लाडकी जोडी म्हणून ओळखली जाते. सिद्धार्थ-कियाराचे जगभरात असंख्य चाहते आहेत. या दोघांच्या अशाच एका चाहतीचं मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, या नावाखाली एका फॅनला तब्बल ५० लाखांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
कियारापासून सिद्धार्थच्या जीवाला धोका? खोटा बनाव रचला अन्..
ही घटना २०२३ ची आहे. मीनू नावाची सिद्धार्थची एक फॅन अमेरिकेत राहते. मीनूने Sidharth Malhotra News FC (@SidMalhotraNews) नावाच्या एका फॅन पेजवर तिने मोठा आरोप केलाय. अलीजा नावाच्या व्यक्तीसोबत मीनूने जे चॅट केलं त्याचा स्क्रिनशॉट तिने शेअर केलाय. अलीजाने सांगितलं की, कियारापासून सिडच्या जीवाला धोका आहे. याशिवाय कियाराने सिडशी जबरदस्ती लग्न करुन तिने सिडच्या परिवाराला संपवण्याची धमकी दिलीय. पुढे अलीजाने असंही सांगितलं की, करण जोहर, मनीष मल्होत्रा असे इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी कियाराला मदत करत आहेत. कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केली असून त्याच्या बँकेचे व्यवहार स्वतःच्या हाती घेतले आहेत. अलीजाने सिद्धार्थसोबत चॅटींग केल्याचे स्क्रीनशॉट पाठवून मीनूला हे सर्व खरं असल्याचं भासवलं.
@sidmalhotra@advani_kiara@dharmamovies@apoorvamehta18@manishmalhotra@delhipolice@missmalini@instantbolly@rudrani_rudz@anchorhimanshi7@hindustantimes@zoomtv@zeetv@NayandipRakshit@KomalNahta@vinilmathew@jubindesai@pin1012@MassZaveri@filmygyan@filmymantrapic.twitter.com/GxdGRMd2q4
— minoo💃🏽🎵 (@desi_girl334) June 30, 2024
तू सिद्धार्थला वाचव असं म्हणत फॅनकडून उकळले पैसे
अशाप्रकारे खोटा बनाव रचत अलीजाने मीनूला फसवलं. सिद्धार्थला वाचवण्यासाठी मीनूने अलीजाला पैसे पुरवले. पुढे मीनूने पैसे दिल्यावर अलिझाने तिची ओळख दीपक दुबे नावाच्या व्यक्तीशी करून दिली. जो सिद्धार्थ मल्होत्राचा बनावट PR टीम सदस्य म्हणून पुढे आला. त्यानंतर मीनूची ओळख राधिका नावाच्या महिलेशी झाली, जी कियाराच्या टीमची माहिती देणारी होती. राधिका सुद्धा फेक होती.
सिद्धार्थ मल्होत्राचा जीव वाचवण्याच्या नावाखाली मीनूने वारंवार पैसे दिले. मीनूने सिद्धार्थला हॅम्पर देण्यासाठी पैसेही दिले. पुढे फोटोशॉप करुन ते हॅम्पर आणि पैसे सिद्धार्थला दिल्याची खात्री मीनूला देण्यात आली. अशाप्रकारे मीनूकडून वारंवार पैसे घेऊन तिला ५० लाखांना गंडवलं गेलं. आपली फसवणूक झाली हे उघड होताच मीनूने सोशल मीडियावर तक्रार केली.