Siddharth Kiara Sangeet : संगीत सोहळ्याआधीच सिद्धार्थ-कियारा पंजाबी गाण्यावर थिरकले, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:21 PM2023-02-06T13:21:15+5:302023-02-06T13:23:49+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या लग्नबंधनात अडकत आहेत.

siddharth malhotra kiara adwani dance together on punjabi song before sangeet ceremony | Siddharth Kiara Sangeet : संगीत सोहळ्याआधीच सिद्धार्थ-कियारा पंजाबी गाण्यावर थिरकले, Video व्हायरल

Siddharth Kiara Sangeet : संगीत सोहळ्याआधीच सिद्धार्थ-कियारा पंजाबी गाण्यावर थिरकले, Video व्हायरल

googlenewsNext

Siddharth Kiara Sangeet : बॉलिवुडमध्ये आणखी एका बिग फॅट वेडिंगला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणी उद्या लग्नबंधनात अडकत आहेत. जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी संगीत फंक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत सोहळ्याच्या आधीच या कपलचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सिद्धार्थ आणि किआरा दोघांचे कुटुंब जैसलमेरमध्ये पोहोचले आहेत. याशिवायल दिग्दर्शक करण जोहर, सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेता शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर हे देखील लग्नासाठी जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत. सिड किआराच्या लग्नाची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. दरम्यान आज संध्याकाळी होणाऱ्या संगीत सोहळ्यापूर्वीच सिड किआरा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पार्टी मूड दिसून येतोय तर किआरा डान्स करण्यात मग्न झाली आहे. किआराने सिल्व्हर रंगाचा लेहेंगा घातला आहे तर सिद्धार्थ काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. 

या बिग फॅट वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. उद्या ७ जानेवारीला सिड किआरा सात फेरे घेतील तर ८ जानेवारी रोजी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: siddharth malhotra kiara adwani dance together on punjabi song before sangeet ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.