कियारासोबतच्या अफेअरच्या प्रश्नावर असा लाजला सिद्धार्थ मल्होत्रा, अशी दिली प्रतिक्रिया!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 06:55 PM2018-08-09T18:55:17+5:302018-08-09T18:55:49+5:30
सिद्धार्थला ‘हिट’ मिळो ना मिळो पण आलियाची जागा घेणारी व्यक्ती मात्र मिळाली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राची धर्मा प्रॉडक्शनच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधून बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री झाली. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’नंतर धर्मा बॅनरच्या ‘एक विलेन’ आणि ‘कपूर अॅण्ड सन्स’मध्ये सिद्धार्थ दिसला. या चित्रपटांनी बऱ्यापैकी यशही मिळवले. पण यानंतर ‘बार बार देखो’, ‘अ जेंटलमॅन’,‘इत्तेफाक’,‘अय्यारी’ असे त्याचे एकापाठोपाठ आलेले चित्रपट आपटले. एकीकडे चित्रपट फ्लॉप झालेत आणि दुसरीकडे आलिया भट्ट सिद्धार्थच्या आयुष्यातून गेली. पण म्हणतात ना, काळ हे सगळ्यांच गोष्टीवरचे औषध आहे. सिद्धार्थला एक ‘हिट’ मिळो ना मिळो पण आलियाची जागा घेणारी व्यक्ती मात्र मिळाली आहे. ती म्हणजे, अभिनेत्री कियारा अडवाणी. सिद्धार्थ व कियारा एकमेकांना डेट करत असल्याचे कळतेय.
अलीकडे सिद्धार्थला याबद्दल छेडण्यात आले. यावर सिद्धार्थ लाजला आणि त्याने हसत हसत उत्तर दिले. अर्थात नकारार्थीच. ‘मीडियात येणारी प्रत्येक बातमी खरी झाली तर काय सांगावे. मी केवळ इतकेच सांगेल की, सध्या मी केवळ माझ्या कामासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. याशिवाय अन्य कुठल्याही गोष्टीसाठी माझ्याजवळ वेळ नाही,’असे तो म्हणाला. आता सिद्धार्थ म्हणतोय, त्यावर विश्वास ठेवायलाचं हवा.
सिद्धार्थ प्रचंड बिझी आहे. करण जोहरच्या ‘कलंक’ या मल्टिस्टारर चित्रपटात तो आहे. याशिवाय परिणीती चोप्रासोबत ‘शॉटगन शादी’ या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे. इतकेच नाही तर विक्रम बत्राच्या बायोपिकमध्येही सिद्धार्थ दिसणार आहे.