Siddharth Shukla Death: सिद्धार्थच्या आईने पोलिसांना दिला जबाब, सांगितलं रात्री काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:55 PM2021-09-02T19:55:53+5:302021-09-02T19:57:54+5:30

सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) अचानक जाण्यानं बॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मित्र करण कुंद्रालाही हा मोठा धक्का आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.

Siddharth Shukla Death: Siddharth's mother told the police what happened last night | Siddharth Shukla Death: सिद्धार्थच्या आईने पोलिसांना दिला जबाब, सांगितलं रात्री काय घडलं

Siddharth Shukla Death: सिद्धार्थच्या आईने पोलिसांना दिला जबाब, सांगितलं रात्री काय घडलं

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता, रात्री जेवणानंतर तो झोपायला गेला. मात्र, सकाळी तो उठलाच नाही, असा जबाब आईने नोंदवला आहे

बार्शी - बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) फेम सिद्धार्थ शुक्ला याचं वयाच्या ४० व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईच्या कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केले. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्यानं टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थनं काही औषधं घेतली होती. त्यानंतर सकाळी सिद्धार्थ झोपेतून उठलाच नाही. आता, सिद्धार्थच्या आईनेही पोलिसांच्या मागणीनुसार जबाब नोंदवला आहे. 

सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) अचानक जाण्यानं बॉलिवूड विश्वाला धक्का बसला आहे. सिद्धार्थचा मित्र करण कुंद्रालाही हा मोठा धक्का आहे. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरियलमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी करण कुंद्रासोबत त्याचं अखेरचं बोलणं झालं होतं. करण कुंद्रानं सिद्धार्थ शुक्लासोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. 

पोलिसांकडून सिद्धार्थच्या मृत्युची सखोली चौकशी सुरू असून निकटवर्तीयांचे आणि जवळच्या नातवाईकांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. त्यानुसार, सिद्धार्थच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्यामध्ये, रात्रीपर्यंत सिद्धार्थ ठीक होता, रात्री जेवणानंतर तो झोपायला गेला. मात्र, सकाळी तो उठलाच नाही, असा जबाब आईने नोंदवला आहे. दरम्यान, यापूर्वीच सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी तो कुठल्याही मानसिक तणावात नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.  

काय म्हणाला कुंद्रा

शॉकिंग, काल रात्रीच आम्ही दोघं फोनवर बोलत होतो. आमच्या दौघांपैकी इंडस्ट्रीमध्ये कोण चांगलं काम करतंय यावर चर्चा होत होती. विश्वास बसत नाही, मित्रा तू लवकर गेलास. नेहमी हसत राहा. खूप दु:खं होतंय असं त्याने सांगितले आहे.

पोस्टमार्टमची झाली व्हिडिओग्राफी

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला पोस्टमोर्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली. संध्याकाळी ६ पर्यंत पोस्टमोर्टम पूर्ण होईल. पोलिसांच्या सूत्रांनुसार, रात्री ३ च्या दरम्यान सिद्धार्थ शुक्लाची तब्येत थोडी बिघडली होती. त्याला वेदना आणि अस्वस्थ वाटत होतं. त्याबाबत त्याने आईला सांगितले. सिद्धार्थ शुक्लाच्या आईनं त्याला पाणी पाजलं आणि पुन्हा झोपवलं. परंतु सकाळी सिद्धार्थ उठलाच नाही. बिग बॉस कार्यक्रमाचा होस्ट आणि अभिनेता सलमान खानने सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तू कायम स्मरणात राहशील असं सलमान म्हटला आहे.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती भावूक

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेदेखील सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली असून सोशल मीडियावर आता तिची चर्चा रंगू लागली आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सिद्धार्थचा एक ब्लॅक एण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने  'Rest In Peace' अशी कॅप्शन दिली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. रियाप्रमाणेच अभिनेता आसिम रियाज, अर्शी खान, राखी सावंत, राहुल महाजन या कालाकारांनीही सिद्धार्थचा फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. 
 

Web Title: Siddharth Shukla Death: Siddharth's mother told the police what happened last night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.