सिद्धार्थ-जॅकलिनचा लिपलॉक करतानाचा फोटो झाला व्हायरल

By Admin | Published: July 10, 2017 01:29 PM2017-07-10T13:29:33+5:302017-07-10T13:59:38+5:30

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा लिपलॉक करतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Siddhartha-Jacqueline's photo of liplock was viral | सिद्धार्थ-जॅकलिनचा लिपलॉक करतानाचा फोटो झाला व्हायरल

सिद्धार्थ-जॅकलिनचा लिपलॉक करतानाचा फोटो झाला व्हायरल

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा लिपलॉक करतानाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र व्हायरल झालेला हा फोटो त्यांच्या खासगी आयुष्यातील नसून आगामी सिनेमा ""अ जेंटलमन"" (A Gentleman) मधील नवं पोस्टर आहे. 
 
दोघांचा बोल्ड अंदाजातील हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा ""बँग बँग"" सिनेमाचा सीक्वेल असल्याचे बोलले जात आहे. मात्र सिनेनिर्मात्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. 
 
ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी सिनेमाचा हा इंटीमेट फोटो रिलीज करण्यात आला आहे. यावरुन सिनेमामध्ये रोमान्सचा तडका असणार हे नक्की. यानिमित्तानं जॅकलीन व सिद्धार्थ पहिल्यांदाच सील्व्हर स्क्रीन शेअर करत आहेत. या दोघांची मोठ्या पडद्यावर केमिस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 
 
सिद्धार्थनं ट्विटरवर ""अ जेंटलमन"" या कॉमेडी अॅक्शन सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केले आहे.  
आणखी बातम्या वाचा
 
दरम्यान,  जॅकलिन फर्नांडिस सध्या नको इतकी बिझी आहे. जॅकलिनने अनेक चित्रपट साईन केले आहेत. करण जोहरचा ‘ड्राईव’, ‘जुडवा 2’, ‘रिलोड’ असे अनेक चित्रपट जॅकलिनच्या हातात आहेत. यातील ‘जुडवा 2’चे शूिटंग जोरात सुरु आहे. तेही एका वेगळ्या लूकसह. होय, जॅकलिन या चित्रपटात एका आगळ्या-वेगळ्या अवतारात दिसणार आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या सेटवरचा एक फोटो जॅकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात जॅक सिल्व्हर शॉर्ट हेअरमध्ये दिसतेय.
 
‘मी ट्रार्इंग टू बी प्रोडक्टिव्ह...’ असे तिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. हा नवा लूक ‘जुडवा 2’चा आहे, हे जॅकने या कॅप्शनमध्ये लिहिलेले नाही. पण जॅकचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्तथिल याने मात्र याबद्दल खुलासा केला आहे. जॅकचा हा लूक ‘जुडवा2’ मधील आहे, असे त्याने सांगितले आहे. जॅकलिन सध्या जस्टीन बीबरच्या इंडिया टूरमुळे चर्चेत आहे. जस्टीनच्या मुंबई टूरदरम्यान जॅकलिन त्याची गाईड बनणार असल्याची खबर आहे. अलीकडे जॅकने सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट नाकारल्याची चर्चा होती.

 

Web Title: Siddhartha-Jacqueline's photo of liplock was viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.