Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा-सिद्धार्थने लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसचं का निवडला? किती आहे एका दिवसाचं भाडं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:07 PM2023-02-06T16:07:12+5:302023-02-06T16:19:45+5:30

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: या शाही महालाचे इनसाइड फोटो समोर आले आहेत. या महालाचा थाट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.  

Sidharth Kiara Wedding Suryagarh Palace In Jaisalmer Cost 2 Crore Per Day | Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा-सिद्धार्थने लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसचं का निवडला? किती आहे एका दिवसाचं भाडं? 

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा-सिद्धार्थने लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसचं का निवडला? किती आहे एका दिवसाचं भाडं? 

googlenewsNext

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding:  सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी उद्या ७ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. आपल्या लग्नासाठी सिद्धार्थ कियारानं राजस्थानच्या जैसलमेरची निवड केली आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेजमध्ये कपल लग्नाच्या आणाभाका घेणार आहे. सध्या अख्खा सूर्यगढ पॅलेज राजेशाही महलासारखा सजवण्यात आला आहे. सिद्धार्थ व कियाराने आपल्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसचं का निवडला? तर हा पॅलेस राजस्थानी इंटीरिअर व शाही आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. या शाही महालाचे इनसाइड फोटो समोर आले आहेत. या महालाचा थाट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.  

'सूर्यगढ पॅलेस' (Suryagarh Palace) हा तसा एक जुना किल्ला आहे. त्याचं मेकओव्हर करुन त्याला हॉटेलचा लूक देण्यात आला आहे. या ठिकाणी त्या साऱ्या सुविधा आहेत ज्या कोणत्याही 7 स्टार हॉटेलमध्ये असतात. स्वीमिंग पूल, बार, हॉल, पाहुण्यांसाठी पारंपरिक लोक नृत्य, पारंपरिक राजस्थानी पक्वान असं सगळं याठिकाणी उपलब्ध आहे.

पॅलेसबाहेर दोन सुंदर उद्यानं आहेत, याच्या बाजूला सुंदर कृत्रिम तलावाचा नजारा आहे. किल्ल्यावर पाच मोठे व्हिला, दोन मोठे रेस्टॉरंट्स, इनडोअर गेम्सची सोय आहे. घोडेस्वारीसाठी मैदाने, मिनी प्राणीसंग्रहालय देखील आहेत.या पॅलेसच्या अंगणात मेहंदी, हळद, संगीत असे सगळे कार्यक्रम होतात. सगळा थाट राजेशाही आहे. कियारा व सिद्धार्थला शाही थाटात लग्न करायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी या पॅलेसची निवड केली. यासाठी या कपलनं कोट्यवधी रूपये माेजलेत.

८४ रूम, ९२ बेडरूम...
६५ एकरात पसलेला हा पॅलेस पिवळ्या दगडांनी बनलेला आहे. याठिकाणी ८४ रूम, ९२ बेडरूम आहेत. याचं एका रात्रीचं भाडं सुमारे १८ हजार ते ३५ हजार रूपये आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी या ठिकाणी १.२० कोटी चार्ज केले जातात. हे भाडं केवळ एप्रिल ते सप्टेंबर महिन्यासाठी आहे. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान ही रक्कम २ कोटीपर्यंत जाते. 

सिद्धार्थ व कियाराने लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी जैसलमेरचा सूर्यगढ पॅलेसमधील 80 रुम बुक केल्याचं कळतंय.  पाहुण्यांसाठी मर्सिडीज-बेंझ, जग्वार आणि बीएमडब्ल्यूसह सुमारे 70 अलिशान कार देखील बुक करण्यात आल्या आहेत.
कियारा आणि सिद्धार्थच्या प्री वेडिंग सेरेमनीला सुरूवात झाली आहे.  या शाही लग्नाला वर्हाडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, इशा अंबानी आदींचा समावेश आहे.

Web Title: Sidharth Kiara Wedding Suryagarh Palace In Jaisalmer Cost 2 Crore Per Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.