Sidharth Kiara Marriage: सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 11:18 PM2022-10-11T23:18:53+5:302022-10-11T23:19:45+5:30

काही दिवसांपूर्वीच दोघांनीही दिली प्रेमाची कबुली

Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Dates Hot Bollywood Couple in Shershah to get married in 2023 all details inside | Sidharth Kiara Marriage: सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा

Sidharth Kiara Marriage: सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार! 'या' दिवशी दिल्लीत पार पडणार सोहळा

googlenewsNext

Sidharth Malhotra Kiara Advani Marriage: बॉलीवूडचे डॅशिंग कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी गेल्या ३ वर्षांपासून डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघेही अनेकदा एकत्र रोमँटिक डेटवर दिसले आहेत. पण अलीकडेच कॉफी विथ करण या शोमध्ये सिद्धार्थ आणि कियाराच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडचे 'शेरशाह' कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ही बातमी ऐकताच त्यांचे चाहते इतके खूश आहेत की सोशल मीडियावर दोघांची नावे ट्रेंड करायला लागली आहेत. त्यांचे लग्न अतिशय भव्य स्वरूपात पण खाजगी पद्धतीने होणार असल्याचे बोलले जात आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...

सिद्धार्थ-कियाराचे दिल्लीत होणार लग्न

शेरशाह या चित्रपटापासून सुरू झालेल्या सिद्धार्थ कियाराच्या प्रेमकहाणीला आता मूर्त स्वरूप मिळणार असल्याचे दिसत आहेत. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडणकार असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत अशा केवळ बातम्या येत होत्या. पण बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, हे दोघेही दिल्लीत लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघे पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाचा सोहळा दिल्लीत करण्यामागचे कारण सिद्धार्थचे कुटुंब दिल्लीत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलीवूडचे हे प्रसिद्ध जोडपे लाईमलाइटमध्ये असताना खाजगी गोष्टींपासून दूर असते. तसेच, यांचे लग्नही खाजगी पद्धतीने होणार असल्याचे बोलले जात आहे. ते आधी रजिस्टर्ड लग्न करणार आहेत, त्यानंतर भव्य सोहळा दिल्लीत होणार आहे. लग्नानंतर कॉकटेल पार्टी आणि नंतर रिसेप्शनचे आयोजन केले जाणार आहे असे सांगितले जात आहे.

पुढच्या वर्षी नक्की कधी होणार लग्न?

सिद्धार्थ आणि कियारा आता त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलू लागले आहेत. दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये हे लग्न होऊ शकते. दोघांनाही लग्न अगदी खाजगी ठेवायचे आहे. या लग्नाला बॉलिवूडमधील कोणालाही आमंत्रित केले जाणार नाही. लग्नाचे सर्व विधी दिल्लीत कुटुंबीयांमध्येच होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. बातम्यांनुसार, दोघे एप्रिल 2023 मध्ये लग्न करणार आहेत. मात्र आतापर्यंत सिद्धार्थ किंवा कियारा या दोघांकडूनही कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Web Title: Sidharth Malhotra Kiara Advani Marriage Dates Hot Bollywood Couple in Shershah to get married in 2023 all details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.