आलिया भट्टसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदा बोलला सिद्धार्थ मल्होत्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 10:13 AM2019-02-04T10:13:29+5:302019-02-04T10:14:27+5:30
सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले.
सध्या आलिया भट्टरणबीर कपूरच्या प्रेमात आहे. कधीकाळी हीच चुलबुली आलिया सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमात होती. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. आता तर सिद्धार्थ व आलिया दोघेही आपआपल्या वाटेने बरेच पुढे निघून गेले आहेत. खरे तर सिद्धार्थ व आलिया हे एकमेकांच्या प्रेमात असतानाही आपल्या रिलेशनशिपवर बोलत नसत. ब्रेकअपवरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. पण अलीकडे करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये मात्र सिद्धार्थने आपले मौन सोडले.
Partners in crime @SidMalhotra and Aditya Roy Kapur take the Koffee couch this week. #KoffeeWithKaran#KoffeeWithSidharth#KoffeeWithAdityapic.twitter.com/wvBkupn2et
— Star World (@StarWorldIndia) January 27, 2019
बे्रकअपनंतर आम्ही कधीही भेटलो नाही. पण आमच्यात एकमेकांप्रती कुठलाही राग, लोभ नाही. आमचे नाते सामान्य आहे. तसेही हे नाते संपून बराच काळ लोटलाय. डेट करण्यापूर्वीपासून मी तिला ओळखत होतो. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’साठी माझा पहिला शॉटही मी आलियासोबतचं दिला होता. आमची मैत्री जुनी होती. दोन लोक परस्परांपासून वेगळे होतात, यामागे काही ना काही कारण असतं. त्यावेळी आमच्यात खूप काही घडत होतं. या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर निश्चितपणे तुमच्याकडे फक्त गोड आठवणीचं तेवढ्या उरतात, असे सिद्धार्थ म्हणाला.
आलियानंतर सिद्धार्थ जॅकलिन फर्नांडिसला डेट करतोय, अशी चर्चा होती. मध्यंतरी तो कियारा अडवाणीला डेट करतोय, असेही ऐकिवात आले. पण सिद्धार्थने या दोन्ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. मी कुणालाच डेट करत नाहीये. सध्या मी सिंगल आहे. जॅकलिनसोबत वेळ घालवणे मला आवडते. पण मी कधीच तिला डेट केले नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. कियाराबद्दलही असे काहीही नाही. मीडियात ज्या काही चर्चा होतात, त्या प्रत्येकवेळी खऱ्या असतातचं असे नाही, असे तो म्हणाला.