वजनदारसाठी सई-प्रियाच परफेक्ट

By Admin | Published: November 3, 2016 02:24 AM2016-11-03T02:24:27+5:302016-11-03T02:24:27+5:30

वजनदार या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघींनी वाढवलेल्या वजनामुळे.

Sigh-Priyach Perfect for Weight Loss | वजनदारसाठी सई-प्रियाच परफेक्ट

वजनदारसाठी सई-प्रियाच परफेक्ट

googlenewsNext


मुंबई- वजनदार या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या दोघींनी वाढवलेल्या वजनामुळे. प्रियाने चक्क या भूमिकेसाठी १६ किलो वजन वाढविले. खरेतर भूमिकेसाठी कलाकार वाटेल ते करु शकतात हे तर आपण पाहिलेच होते. परंतु प्रियाने एवढे वजन वाढवून पुन्हा ते कमी देखील केले. या चित्रपटासाठी या दोन्ही अभिनेत्रींनी अपार मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी तर सई आणि प्रियालाच या चित्रपटात घेण्याचे आधीच ठरविले होते. सिनेमाची कथा लिहितानाच सचिनला या दोन अभिनेत्री समोर दिसत होत्या. मी वजनदारसाठी या दोघींचाच विचार केला असल्याचे सचिनने लोकमत सीएनएक्सशी संवाद साधताना सांगितले. तू सुरुवातीलाच वजन वाढविलेल्या आभिनेत्रींचा या भूमिकेसाठी विचार का केला नाहीस असे सचिनला विचारले असता, त्याने सांगितले मी या भूमिकेसाठी दोघींचा विचार केला तेव्हाच मला वाटले होते, या दोघीही वजनदारमधील त्यांच्या पात्रांना शंभर टक्के न्याय देणार. त्यांनी माझा विश्वास सार्थ ठरविला. या दोघींनी जीव ओतून त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. वजनदार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळतेय. सई आणि प्रियाला नवीन लुकमध्ये पाहायण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असल्याचे दिसते आहे. सध्या वजनदार या चित्रपटाची सगळीकडेच हवा असल्याचे दिसतेय. आता सई आणि प्रिया या दोघी या चित्रपटासाठी परफेक्ट असल्याचे सचिनने तर सांगितले आहे. पाहुयात मग या दोघींनी चित्रपटात काय धमाल केलीय ते आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Sigh-Priyach Perfect for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.