‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 01:35 PM2019-01-01T13:35:46+5:302019-01-01T13:38:32+5:30

होय, गत शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची 100 कोटींकडे घोडदौड सुरू आहे.

simmba box office collection day 4 |  ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

 ‘सिम्बा’ची घोडदौड सुरूच, चार दिवसांत कमावले इतके कोटी!

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ भारतासह जगभरात 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे.

बॉलिवूडचा सर्वाधिक एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सिम्बा’ बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. होय, गत शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाची 100 कोटींकडे घोडदौड सुरू आहे. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने 96.35 कोटींचा गल्ला जमावला.




पहिल्या दिवशी या चित्रपटाने 20.72 कोटींची कमाई करत, जोरदार ओपनिंग केली. दुस-या दिवशी 23.33 आणि तिस-या दिवशी 31.06कोटी कमावले. पहिल्या आठवड्यांत शानदार कमाई केल्यानंतर दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, रिलीजच्या चौथ्या दिवशी सोमवारी 21.24 कोटींचा गल्ला जमवला. म्हणजेच पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने 96.35 कोटींची कमाई केली. न्यू ईअर आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला जोरदार लाभ मिळतोय. आता हा चित्रपट 100 कोटी क्लबपासून केवळ एक पाऊल दूर आहे. नववर्षात ‘सिम्बा’च्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. 


करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ भारतासह जगभरात 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान लीड रोलमध्ये आहेत. सोनू सूद आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अजय देवगण आणि अक्षय कुमार यात कॅमिओ रोलमध्ये आहेत. विशेष बाब म्हणजे, ‘सिम्बा’ हा साऊथचा चित्रपट ‘टेम्पर’चा हिंदी रिमेक आहे. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटातील गाणी आधीच हिट झाली आहेत. आता यातील अ‍ॅक्शन सीन्सची चर्चा आहे. रणवीर व अजय देवगण यांचा गुंडासोबतचा फेस आॅफ अतिशय शानदार आहे. ‘सिम्बा’वर प्रेक्षकांच्या उड्या पडताहेत, त्याचे हेच कारण आहे.

Web Title: simmba box office collection day 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.