आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 02:17 PM2024-12-01T14:17:35+5:302024-12-01T14:19:38+5:30
प्रसिद्ध गायिका दुआ लिपाने तिच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजवताच एकच जल्लोष झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय
शाहरुख खानची जगभरात किती क्रेझ आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. जगभरातले चाहते किंग खानवर मनापासून प्रेम करतात. यामध्ये सामान्य माणसांंपासून कलाकारही सहभागी आहेत. याचा अनुभव नुकताच आला. सध्या जगात लोकप्रिय असलेली आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपा भारतात आहे. यावेळी म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान दुआने गाणं गात असतानाच मध्येच शाहरुखच्या गाण्याच्या ओळी वाजवल्याने लोकांनी एकच जल्लोष केला. बघा काय घडलं.
दुआने वाजवलं शाहरुखचं गाणं अन्...
दुआ लिपाच्या म्यूझिक कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. झालं असं की, ३० नोव्हेंबरला दुआचा मुंबईत म्यूझिक कॉन्सर्टचा कार्यक्रम होता. त्यावेळी अचानक गाता गाता दुआने शाहरुखच्या गाण्याच्या ओळी वाजवताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दुआने तिच्या लेविटेटिंग गाण्यासोबत शाहरुखच्या 'बादशाह' सिनेमातील 'वो लडकी जो' गाण्याचं भन्नाट मॅशअप केलं. अनपेक्षितपणे हे मॅशअप ऐकताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करत दुआला चांगलीच दाद दिली.
शाहरुखची लेक सुहाना काय म्हणाली?
सोशल मीडियावर दुआच्या कॉन्सर्टचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. जगभरातले फॅन्स या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. शाहरुखची लेक सुहानाने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत पसंती दिलीय. मुकेश अंबानींची सून राधिका मर्चंट, ईशा अंबानीचे पती आनंद पिरामल, अभिनेत्री नेहा शर्मा आणि इतरही अनेक कलाकार कॉन्सर्टमध्ये सहभागी होते. गायिका दुआचा आवडता अभिनेता शाहरुख आहे. त्यामुळेच किंग खानच्या प्रेमापोटी तिने तिच्या गाण्यासोबत हे मॅशअप केलेलं दिसलं.