अखेर कनिका कपूरची पाचवी कोरोना टेस्ट आली नेगेटिव्ह, डॉक्टर म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 07:09 PM2020-04-04T19:09:38+5:302020-04-04T19:12:26+5:30
कनिकावर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत
बॉलिवूड सिंगर कनिका कपूरची पाचव्यांदा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि यावेळी तिचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. या आधी चारही वेळा कनिकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार कनिकाची तब्येत आता स्थिर आहे मात्र अजून काही दिवस तिला रुग्णालयात ठेवण्यात येईल. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कनिका आता बरी आहे आणि ती बोलू शकते तसेच आरामात आपली काम करु शकते. कनिकावर लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. कनिकाचा चौथा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तिच्या कुटुंबीयांच्या चिंता वाढली होती.
Bollywood singer Kanika Kapoor's fifth #COVID19 test result comes negative. However, she will have to stay at PGI Hospital Lucknow until one more test result comes as negative. (file pic) pic.twitter.com/BEJevytlOj
— ANI (@ANI) April 4, 2020
कनिका काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भावूक पोस्ट देखील शेअर केली होती. ज्यात तिने लिहिले होते की, झोपायला जातेय, तुम्हा सगळ्यांना प्रेम़ सुरक्षित राहा़ माझी चिंता केल्याबद्दल आभार. पण मी आयसीयूमध्ये नाही़ मी ठीक आहे. माझी पुढची कोरोना टेस्ट निगेटीव्ह येईल, अशी आशा करते. माझ्या मुलांजवळ आणि कुटुंबीयांजवळ परत जाण्याची वाट पाहतेय. मी त्यांना खूप मिस करतेय....
कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिने एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर 20 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिने आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या 2 दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याचे तिने म्हटले होते़ मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशात तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तिच्याविरोधात एक नाही तर तिन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत़.