Laal Singh Chaddha : 'लाल सिंग चढ्ढा'चे समर्थन केल्यामुळे राहुल देशपांडे झाले ट्रोल, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 10:19 AM2022-08-12T10:19:32+5:302022-08-12T10:44:04+5:30
Rahul Deshpande : राहुल देशपांडे यांनी 'लाल सिंग चड्ढा'चे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. वाढता विरोधत बघत त्यांना आणखी एक पोस्ट शेअर करावी लागली.
आमिर खानचा ड्रिप प्रोजेक्ट असलेल्या लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एक वर्ग आहे जो या सिनेमांचे कौतुक करतोय दुसरा वर्ग या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी करतोय. या सगळ्याच्या दरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी लाल सिंग चड्ढाच्या प्रिमियरला उपस्थित लावली होती. तसंच सिनेमाचे कौतुक करणारी पोस्टदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यावरून त्याला सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं. अखेर राहुल यांनी स्वत: याबाबत पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.
राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर आमिर खानसोबतचा फोटो शेअर करत चित्रपटाचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं होते. त्याचसोबत आमिर खान, करिना कपूर, मोना सिंग आणि नागा चैतन्यच्या अभिनयाचं कौतुक केलं होते. त्यांनी त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. फेसबुक आणि ट्विटरवर त्यांच्या या पोस्टला रोषाचा सामना करावा लागत आहे. लोकांचा वाढता विरोध पाहता राहुल देशपांडे यांनी आपली बाजू स्पष्ट करत आणखी एक पोस्ट लिहिली.
#LaalSinghChaddha is a film with a lot of heart! It stirs you from within. Brilliant Acting by Aamir Khan. Amazing performances by Kareena, Mona Singh and @chay_akkineni. Beautiful adaptation. Thanks Ajit and Deepa for inviting us 🤗#AamirKhan
— Rahul Deshpande (@deshpanderahul) August 11, 2022
@AndhareAjit@Viacom18Studiospic.twitter.com/IVS0VkY5Ky
राहुल देशपांडे यांची नवी पोस्ट
नमस्कार रसिक मित्रहो !! लालसिंग चढ्ढा ह्या चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेस मी व्यक्त केलेल्या विधानातून पूर्णतः अनपेक्षित संदेश जातोय, असं मला वाटतंय. त्या प्रिमीयरसाठी एक निमंत्रित कलाकार म्हणून, मी त्या चित्रपटासाठी परिश्रम घेतलेल्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्वांविषयी सद्भावना व्यक्त केल्या. ह्याचा अर्थ चित्रपटातील कलाकारांनी ह्यापूर्वी केलेल्या कुठल्याही कृतीचे वा त्यांनी मांडलेल्या विचारांचे मी समर्थन करतो असे मुळीच नाही.
आपणां सर्वांइतकीच भारतीयत्वाची भावना माझ्या मनांतही प्रबळ आहे व मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच माझ्या विधानाचा विपर्यास करून घेऊ नये, अशी आपणां सर्वांकडे नम्र विनंती ! लोभ आहेच. वृद्धिंगत व्हावा !!