गायिका श्रेया घोषाल विवाहबद्ध

By Admin | Published: February 6, 2015 12:22 PM2015-02-06T12:22:08+5:302015-02-06T12:23:07+5:30

'डोला रे डोला रे', 'मनवा लागे', 'जादू है नशा है' या आणि अशा अनेक सुमधुर गाण्यांनी रसिकांच्या मनावर भुरळ पाडणारी गायिका श्रेया घोषाल लग्नगाठीत अडकली आहे.

Singer Shreya Ghosal married | गायिका श्रेया घोषाल विवाहबद्ध

गायिका श्रेया घोषाल विवाहबद्ध

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - 'डोला रे डोला रे', 'मनवा लागे', 'जादू है नशा है' या आणि अशा अनेक सुमधुर गाण्यांनी रसिकांच्या मनावर भुरळ पाडणारी गायिका श्रेया घोषाल लग्नगाठीत अडकली आहे. श्रेया आणि तिचा मित्र शिलादीत्य दोघेही काल ( ५ फेब्रुवारी) विवाहबद्ध झाले. खुद्द श्रेयानेच तिच्या ऑफिशअल ट्विटर अकाऊंटवरून चाहत्यांना ही खुषखबर दिली. ' काल रात्री कुटुंबिय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत मी आणि शिलादित्य लग्नबंधनात अडकलो. आयुष्यातील या नव्या पर्वाबद्दल मी खूप उत्सुक आहे,' असेही तिने म्हटले आहे. 
संजय लीला भन्साळींच्या 'देवदास' चित्रपटाद्वारे संगीत सृ्टीत पदार्पण करणा-या श्रेयाला या चित्रपटातील गीतांसाठी अनेक पुरस्कार मिळाले. आपल्या सुमधुर आवाजाने तिने चाहत्यांच्या मनावर गारूड केले असून वैविध्यपूर्ण शैलीतील गाण्यांमुळे ती खूप नावाजली गेली आहे. 

Web Title: Singer Shreya Ghosal married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.