सुप्रियाने काढले रुपलचे स्केच!
By Admin | Published: July 9, 2017 01:29 AM2017-07-09T01:29:20+5:302017-07-09T01:29:20+5:30
कांचनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया विनोद या खऱ्या आयुष्यात एक उत्तम चित्रकारही आहेत, हे खूपच कमी जणांना माहीत आहे. अभिनयाबरोबरच त्या
कांचनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया विनोद या खऱ्या आयुष्यात एक उत्तम चित्रकारही आहेत, हे खूपच कमी जणांना माहीत आहे. अभिनयाबरोबरच त्या आपली चित्रकलेची आवडही आवर्जून जपतात. चित्रीकरणाच्या दरम्यान मिळणाऱ्या वेळेत त्या अनेक वेळा चित्र काढताना दिसतात. त्यांच्या अप्रतिम चित्रकलेचा नमुना नुकताच मालिकेच्या सेटवर सगळ्यांना पाहायला मिळाला. सुप्रिया विनोदचा जास्तीत जास्त वेळ हा सध्या मालिकेच्या सेटवर जातो. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांसोबत त्यांचे खूपच चांगले नाते जमले आहे. त्यांची हेअर ड्रेसर सोनू आणि त्यांचे ट्युनिंग तर खूपच छान आहे. आजवर चाहत्यांनी कलाकारांचे स्केच काढल्याचे आपल्याला अनेकदा दिसून आले आहे. मात्र, सुप्रिया विनोद यांच्यासारख्या सीनियर कलाकाराने मालिकेच्या हेअर ड्रेसरचे स्केच करून सर्वांनाच सुखद धक्का दिला. सुप्रिया विनोद यांनी जे जे स्कूल आॅफ आर्टमधून चित्रकलेचे शिक्षणही घेतले आहे.
मालिकेच्या चित्रीकरणावेळी थोडा निवांत वेळ मिळाल्यावर आपली चित्रकला जोपासत तो वेळ सत्कारणी त्या लावत असतात. सेटवरच स्केच करण्यासाठी हेअर ड्रेसर सोनू आणि राधाची भूमिका साकारणारी रुपल नंद या त्यांच्यासाठी मॉडेल ठरल्या आहेत. त्यांच्या नकळत सुप्रिया यांनी त्यांचे स्केच कागदावर काढले. आपली छबी चित्ररूपात पाहून सोनू आणि रुपल दोघीही एकदम खूश झाल्या होत्या. आता भविष्यात सुप्रिया विनोद कोणकोणत्या कलाकारांचे स्केच काढतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.