बँजोची संथ सुरुवात
By Admin | Published: September 28, 2016 02:15 AM2016-09-28T02:15:04+5:302016-09-28T02:15:04+5:30
‘पार्चेड, वाह ताज, चाफेकर ब्रदर्स, दिल साला सनकी’ सगळेच फ्लॉप ठरले आहेत. मात्र, संथ सुरुवातीनंतर ‘पिंक’ची घोडदौड सुरूच आहे. मराठी चित्रपटांची वाईट परिस्थिती
‘पार्चेड, वाह ताज, चाफेकर ब्रदर्स, दिल साला सनकी’ सगळेच फ्लॉप ठरले आहेत. मात्र, संथ सुरुवातीनंतर ‘पिंक’ची घोडदौड सुरूच आहे. मराठी चित्रपटांची वाईट परिस्थिती अशी स्थिती सध्या बॉक्स आॅफिसवर पाहायला मिळते आहे.
‘बँजो’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक रवी जाधव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘बँजो’ हा विषयच मुळी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या परंपरेत बसणारा. महाराष्ट्रातील उत्सवांमध्ये बँजो वाजविण्याची जुनी परंपरा आहे. रवी जाधव यांच्यासाठी ही एक उत्कृष्ट अशी संधी होती, परंतु चित्रपटाची भट्टी जमली नाही. चित्रपटाला या मातीतले संगीत पाहिजे होते, असे असताना संगीतावर आधारित या चित्रपटातील संगीत पाश्चिमात्य बाजाकडे वळणारे जास्त होते. अभिनेत्री या नात्याने नर्गिस फाखरीची निवडच चुकीची होती. चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपटाचे कलेक्शन अगदीच वाईट आहे. पार्चेड, वाह ताज, दिल साला सनकी, चाफेकर ब्रदर्स या सर्व चित्रपटांची वाताहत झाली आहे. ‘पिंक’ चित्रपटाने मात्र संथ सुरुवातीनंतर चांगलीच गती पकडली आहे. चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमविला आहे. या दरम्यान, मराठी चित्रपटांची मात्र परिस्थिती खूपच खराब आहे. ‘सैराट’ प्रदर्शित होऊन पाच महिने झाले, परंतु या दरम्यान एकही चित्रपट खऱ्या अर्थाने हिट झालेला नाही.
- एन. पी. यादव, ट्रेन्ड अॅनिलिस्ट