मराठीतील छोटे ‘जय वीरू’

By Admin | Published: June 24, 2017 01:20 AM2017-06-24T01:20:09+5:302017-06-24T01:20:09+5:30

शालेय जीवनातील दोन अल्लड मित्रांच्या कथेवर आधारित ‘अंड्याचा फंडा’ या सिनेमाचा ट्रेलर सध्या भरपूर गाजत आहे. बच्चेकंपनीपासून ते थोरामोठ्यांपर्यंत या सिनेमाच्या ट्रेलरने

The small 'Jai Veeru' in Marathi | मराठीतील छोटे ‘जय वीरू’

मराठीतील छोटे ‘जय वीरू’

googlenewsNext

शालेय जीवनातील दोन अल्लड मित्रांच्या कथेवर आधारित ‘अंड्याचा फंडा’ या सिनेमाचा ट्रेलर सध्या भरपूर गाजत आहे. बच्चेकंपनीपासून ते थोरामोठ्यांपर्यंत या सिनेमाच्या ट्रेलरने आणि खास करून ‘डुबुक डुबुक’ गाण्याने मोठी धूम ठोकली आहे. अंड्या आणि फंड्या या सिनेमातील दोन पात्रांना रसिकांनी ‘जय-वीरू’ची जोडी असे देखील नामकरण करून टाकले आहे. ज्याप्रमाणे ‘शोले’च्या जय-वीरूची जशी स्कूटर आहे तशीच एक सुंदर सायकल या दोघांचीदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टीनिर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे लिखाण आणि दिग्दर्शन संतोष शेट्टी यांनी केले आहे.
अंड्या आणि फंड्या अशी या सिनेमातील दोन पात्रांची नावे असून त्यांच्या मैत्रीचा धम्माल पण तितकाच गूढ फंडा ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अथर्व बेडेकर (अंड्या) आणि शुभम परब (फंड्या) या बालकलाकारांनी ही दोन पात्रं साकारली असून या दोघांची आॅफ-स्क्रीन मैत्रीदेखील अगदी तशीच घनिष्ट आहे. खऱ्या आयुष्यात अथर्व आणि शुभम लहानपणापासूनचे चांगले मित्र असून त्यांची ही ट्युनिंग चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
तसेच आतापर्यंत मराठीतील अनेक चित्रपटात दोन मित्राच्या जोडीला ‘जय-वीरू’ने नावाजले गेले असेल पण पहिल्यांदाच बाल कलाकारांची आॅन स्क्रीन आणि आॅफ स्क्रीन जोडी ‘अंड्याचा फंडा’ या सिनेमाच्या निमित्ताने सुपर डुपर हिट ठरलेली दिसून येत आहे. तसेच मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एक युनिक विषय हाताळला जात असल्यामुळे यात अंड्या नेमका कोणता फंडा मांडणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: The small 'Jai Veeru' in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.