स्मिता बदलणार इमेज !

By Admin | Published: September 23, 2016 02:53 AM2016-09-23T02:53:27+5:302016-09-23T02:53:27+5:30

‘पप्पी दे पारूला’, ‘कांताबाई’ यासारख्या गाण्यांमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकरने प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवला आहे.

Smita to change image! | स्मिता बदलणार इमेज !

स्मिता बदलणार इमेज !

googlenewsNext

‘पप्पी दे पारूला’, ‘कांताबाई’ यासारख्या गाण्यांमुळे अभिनेत्री स्मिता गोंदकरने प्रेक्षकांच्या मनावर वेगळा ठसा उमटवला आहे. उत्तम नृत्यांगना असलेली स्मिता अभिनयातही आपली छाप पाडण्याचे पूर्ण प्रयत्न करीत आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस अनवॉन्टेड’बाबत ती खूप उत्सुक आहे. या चित्रपटात ती ‘हटके’ भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी स्मिताने ‘लोकमत सीएनएक्स’शी मनमोकळा साधलेला संवाद खास वाचकांसाठी...

या चित्रपटात तू पहिल्यांदा ‘पत्नी’च्या भूमिकेत दिसणार आहेस, या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल ?
-माझ्या भूमिकेचे नाव रिया असे आहे. रिया आजच्या युगात जगणारी स्त्री आहे. लग्नानंतरही तिला आपले करिअर करायचे असते. आजकाल नवऱ्या-बायको दोघांनाही नोकरी करणे गरजेचे असते. ते करत असताना बऱ्याच गोष्टींचा प्राधान्यक्रम नकळतपणे बदलत जातो. रियाच्या ही आयुष्यात असेच काही होते. आणि त्यानंतर रियाचे आयुष्य कसे बदलते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
हा सिनेमा ग्लॅमरस नाही सिनेमाकडे तरुणवर्ग आकर्षित होईल असं वाटतं का ?
- हा सिनेमा जरी फक्त पती-पत्नीतील नात्यावर भाष्य करणार असला तरी तो ठराविक वयोगटातील लोकांसाठी नाही. या सिनेमातून काही नाजूक विषयांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक हा सिनेमा बघू शकतो. तुम्ही कुटुंबासोबत बसून हा सिनेमा नक्की पाहू शकता.
तू आयटम साँगच्या माध्यमातून घराघरात पोहोचलीस हा तुझा अनुभव कसा होता ?
- माझं ‘पप्पी दे पारूला’ हे गाणं प्रेक्षकांच्या चांगलचं पसंतीस उतरले. मला डान्सची फार आवड आहे. त्यामुळे मी डान्स नंबरला कधीच नाही म्हणत नाही. माझी गाणी पाहिल्यानंतर मला प्रेक्षकांकडून किंवा मित्र मैत्रिणींकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या संमिश्र स्वरूपाच्या होता. काही जणांना माझ ‘पप्पी दे पारूला’ हे गाणं फार आवडले तर एक वर्ग असा ही होता ज्यांना जे गाणं अजिबात आवडले नव्हते.
तुला ग्लॅमरस भूमिकाच साकारायला आवडतील की सशक्त, स्त्रीप्रधान व्यक्तिरेखेतही तू प्रेक्षकांना दिसणार आहेस का?
- मी आत्तापर्यंत डान्स नंबर आणि काही विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. परंतु, अशा प्रकारच्या भूमिका साकारताना तुम्हाला अभिनय दाखविण्यासाठी जास्त वाव नसतो. मात्र सशक्त भूमिका साकारताना तुमच्या अभिनयाचा कस लागतो. त्यामुळे मला यापुढे सशक्त भूमिका करायला जास्त आवडतील. तसेच नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्यावर माझा भर असतो.
चित्रपटात तर तुला प्रेक्षकांनी पाहिले आहेच, रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार ?
- मी याआधी ‘अयोध्या’ या नाटकात काम केले होते. मात्र, त्या नाटकाचे पुण्यात फक्त दोन प्रयोग झाले. त्यानंतर मी आता पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर पदार्पण करायला सज्ज झाली आहे. ‘सौजन्याची ऐशीतैशी’ या नाटकात मी काम करणार आहे. केदार शिंदे, भरत जाधव या जोडीसोबत काम करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे हे नाटक माझा करिअरच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Smita to change image!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.