Smriti Irani : स्मृती इराणींनी वजन घटविले; फोटो पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:53 PM2021-08-18T16:53:37+5:302021-08-18T17:35:59+5:30
Smriti Irani weight loss: स्मृती इराणींनी वजन घटविले आहे. त्यांचा फोटो पाहून चाहते झाले हैरान झाले आहेत. अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये स्मृती या वजन उचलताना दिसून येत होत्या.
टीव्हीवरील पॉप्युलर सीरिअल 'क्योंकि सास भी कभी बहू थी' एकेकाळी घराघरात पाहिली जात होती. या मालिकेत तुलसी विरानीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांनी दर्शकांवर अनेक वर्षे राज्य केले. आजही त्या तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. मात्र, आता त्यांनी राजकारणाचे क्षेत्र निवडले आहे. आजकाल त्या एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत असतात. (Netizens talking about Smriti Irani's drastic weight loss)
स्मृती इराणींनी वजन घटविले आहे. त्यांचा फोटो पाहून चाहते झाले हैरान झाले आहेत. अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये स्मृती या वजन उचलताना दिसून येत होत्या.
यानंतर स्मृती यांनी सोशल मिडीयावर तीन फोटो शेअर केले, ते कोलाजमध्ये बनलेले होते. या फोटोमध्ये त्यांनी मास्क देखील घातले आहे. 'मंडे मंत्र, इअर रिंग्स, नोज पिन घाला किंवा नको घालू पण मास्क अवश्य घाला.'', असे म्हणत त्यांनी फोटो पोस्ट केले आहेत.
हा फोटो पाहून इराणी यांचे फॅन्स हैरान झाले आहेत. स्मृती यांच्या वजन घटविण्यार चर्चा करत आहेत. एका फॅनने लिहिले की, ओरिजिनल स्मृती बेन परत आलीय. दुसऱ्या फॅनने म्हटले की, तुम्ही वजन घटविल्यानंतर परत येत आहात की नव्या झाल्या आहात?.
स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची चर्चा
काही दिवसांपुर्वीच ॲन्कर मनिष पॉल यांनी स्मृती इराणी यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो मनिष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले होते. या फोटोमध्ये मनिष यांच्या हातात एक काढा असलेला एक कप दिसत होता आणि बाजूलाच स्मृती इराणी यादेखील बसल्या होत्या. या फोटोमध्ये असणारी वैशिष्ट्यपुर्ण बाब म्हणजे यामध्ये स्मृती इराणी यांचे वजन खूपच कमी झालेले दिसत आहे. वजन कमी झाल्यामुळे साहजिकच त्या पहिल्यापेक्षा अधिक यंग दिसू लागल्या आहेत आणि या बदलाच्या मागे काढा पिणे हे रहस्य लपलेले आहे, असे देखील मनिष यांनी स्पष्ट केले होते.