नागा चैतन्यची 'मेहुणी' समांथाने शेअर केले साखरपुड्याचे फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:38 PM2024-08-14T15:38:40+5:302024-08-14T15:39:35+5:30
नागार्जुनच्या हैदराबादच्या घरात नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपुडा पार पडला.
Naga Chaitanya Sobhita Samanta : तेलुगू अभिनेता नाग चैतन्यने (Naga Chaitanya) 8 ऑगस्ट रोजी गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालाशी (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला. तीन वर्षांपूर्वी समांथा रूथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu) विभक्त झाल्यावर नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. बऱ्याच काळापासून तो आणि शोभिता धुलीपाला डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. अखेर साखरपुडा केल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताचं नेटकऱ्यांनी अभिनंदन केलं आहे. यातच समांथानेदेखील (Samantha) शोभिता आणि नागा चैतन्यचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे.
नागार्जुनच्या हैदराबादच्या घरात नागा चैतन्य आणि शोभिताचा साखरपुडा पार पडला. या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रही उपस्थित राहिले. या साखरपुड्याला समंथानेदेखील हजेरी लावली होती. यासोबतच समांथाने नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचे फोटो शेअर करत लिहलं, "2022 पासून अनंतापर्यंत कायमचे". ही समांथा म्हणजे नागा चैतन्यची पूर्व पत्नी नसून शोभिताची बहीण आहे. शोभिताची बहीण म्हणजेच नागा चैतन्यची मेहुणी आहे. शोभिताच्या बहिणीचं नाव समंथा धुलिपाला असं आहे. नागा चैतन्यची मेहुणी आणि पुर्व पत्नी यांची नावे सारखी असल्याने चाहत्यांचा थोडा गोंधळ उडाल्याचं दिसून आलं.
शोभिताची बहिण समांथा ही एक डॉक्टर आहे. तिच्या पोस्टमधील कॅप्शनवरुन शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य 2022 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. साखपूडा पार पडलेला असाल तरी ते दोघे लग्न कधी करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शोभिता ही 32 वर्षांची असून नागा चैतन्य 37 वर्षांचा आहे. नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथसोबत लग्न केले होते, पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.