Social Viral: लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 09:23 AM2022-04-11T09:23:49+5:302022-04-11T09:26:48+5:30
पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही या डायलॉगची सगळीकडेच धुंदी दिसून आली.
मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा' हा चित्रपट चांगलाच हिट झाला. हिंदी भाषेत या चित्रपटात पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अल्लू अर्जुनसाठी मराठमोळ्या श्रेयस तळपदे याने आवाज दिला होता. त्यातील, पुष्पा समज के फ्लॉवर समझा क्या... प्लॉवर नही फायर है मै... झुकेगा नही हा डायलॉग तुफान हिट ठरला. चित्रपटातील या डायलॉगने आणि श्रीवल्ली गाण्याने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला होता. आता, नवरदेवाने चक्क लग्न मांडवात पुष्पाची कॉपी केली.
पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नही या डायलॉगची सगळीकडेच धुंदी दिसून आली. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत, अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत आणि राजकीय वर्तुळातही हा पुष्पा मै झुकेगा नही... असे म्हणताना दिसून आला. आता, एका लग्नकार्यात चक्क नवरदेवाने हार परिधान करताना 'मै झुकेगा नही' म्हटले. नवरा-नवरीचा पुष्पहार घातलानाचा सोहळा सुरू होता. त्यावेळी, नवरदेवाच्या मित्रांनी त्यास उंच खाद्यावर घेतले. त्यावेळी, नवरदेवाने पुष्पातील डायलॉग मारला. मै झुकेगा नही... असे म्हणत त्याने पुष्पास्टाईल मारली. मात्र, नेटीझन्सने नवरदेवाला मोलाचा सल्ला दिलाय.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. nehu22sa नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर १.१ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर, हजारो कमेंट आल्या आहेत. त्यापैकी, अनेकांनी झुक जा बेटा... नही तो पुरी जिंदगी झुकना पडेगा.. असे म्हणत दाद दिली आहे. तर, काही झुकनाच पडेगा... असंही म्हटलंय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.