"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:24 PM2024-10-22T12:24:57+5:302024-10-22T12:26:10+5:30

सीमा सजदेहने नुकतीच 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' या शोमध्ये हजेरी लावली होती. एका व्यक्तीने एका महिन्याचे ८ हजार डॉलर देतो म्हणत मला खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं तिने सांगितलं.

sohail khan ex wife seema sajdeh revealed that someone try to buy her offer 8 thousands dollar | "८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग

"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग

बॉलिवूड अभिनेता सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेह सध्या चर्चेत आहे. सीमा सजदेहने नुकतीच महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारीसोबत 'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स' या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने लग्न, घटस्फोट याबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. या मुलाखतीत सीमाने तिच्या आयुष्यात घडलेला एक विचित्र प्रसंग सांगितला. एका व्यक्तीने सीमाला खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला. 

'फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स'  शोमध्ये सीमा सजदेहला विचित्र DM बाबत विचारलं गेलं. याबाबत सांगताना तिने एका व्यक्तीने एका महिन्याचे ८ हजार डॉलर देतो म्हणत मला खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. सीमा म्हणाली, "हे खूपच धक्कादायक होतं. त्या व्यक्तीने मेसेज केला होता की मला तुला माझ्याजवळ ठेवायला आवडेल. पण, याचं एक बजेट असेल. मी तुला ७-८ हजार डॉलर देईन, असं तो म्हणाला. मी त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला आणि मला धक्काच बसला. ती व्यक्ती १०० वर्षांची वाटत होती". 

सोहेल आणि सीमाने २०२२ मध्ये घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं जाहीर केलं होतं. दोघांनी १९९८ साली लग्न केले होते. त्यावेळी दोघे वयाने खूप लहान होते.  जवळपास २४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि सोहेल यांना योहान आणि निरवान ही दोन मुले आहेत. दोघांचे नाते संपले असले तरी सीमा आणि सोहेल दोघेही दोन्ही मुलांची काळजी घेतात. निरवान २३ वर्षांचा आहे तर योहान त्याच्यापेक्षा छोटा आहे. 

सोहेलशी घटस्फोट घेतल्यानंतर सीमाने आयुष्यात पुढे गेल्याचा खुलासा केला. सध्या ती विक्रम आहुजा या तिच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करत आहे. सोहेलशी लग्न करण्यापूर्वी सीमाने विक्रमसोबत साखरपुडा केला होता. मात्र नंतर तिचे सोहेलवर प्रेम जडले आणि तिने लग्न केले.  

Web Title: sohail khan ex wife seema sajdeh revealed that someone try to buy her offer 8 thousands dollar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.