'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना', अर्जुनला डेट करत असल्याच्या चर्चेवर मलायकाने अशी केली होती बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:27 PM2021-03-31T20:27:28+5:302021-03-31T20:27:53+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा २०१७ साली अरबाज खानसोबत विभक्त झाली होती. त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करू लागली.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा २०१७ साली अरबाज खानसोबत विभक्त झाली होती. त्यानंतर तिचे अर्जुन कपूरवर प्रेम जडले होते. दोघे जवळपास तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. मलायका नेहमी वयाने १२ वर्षे लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत असल्यामुळे ट्रोल होते. याबद्दल तिने एका मुलाखतीत असे काही उत्तर दिले आणि सर्वांची बोलती बंद केली.
मलायका अरोराने म्हटले होते की, समस्या वयात नाही. समाज महिलांना कमी लेखण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. जर तुम्ही स्वावलंबी आणि कणखर महिला असाल तर तुम्ही त्यांच्या निशाण्यावर असतात. मला नेहमी सोशल मीडियावर सल्ला दिलो जातो की तुला तुझ्या वयानुसार कपडे परिधान केले पाहिजे. याचा काय अर्थ आहे? जे तुम्ही परिधान करता जे तुम्हाला आवडते? जर माझ्या कपड्यांशी तुम्हाला समस्या आहे तर ती तुमची समस्या आहे.
मलायकाने पुढे म्हटले की, जर मी पुन्हा रिलेशनशीपमध्ये पडल्यामुळे तुम्हाला समस्या आहे तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. जर माझ्या पार्टनरचे वय कमी असल्याचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर ही तुमची समस्या आहे. मी इथे सर्वांना खूश ठेवण्यासाठी आलेले नाही.
वाढत्या वयासोबत मला ही शिकवण मिळाली आहे की, लोकांच्या म्हणण्याकडे कसे पहायचे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याने मला एक टक्केदेखील फरक पडत नाही. तुम्ही काय माझे बिल भरत आहात का? तर मी तुम्हाला कोणत्या गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ?, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना.