शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ पाहून इतकी का भडकली ‘ही’ सिंगर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 12:08 PM2019-06-23T12:08:13+5:302019-06-23T12:11:00+5:30
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण एका बॉलिवूड सिंगरने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे.
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण याचदरम्यान बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. सोनाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना टॅग करत, या चित्रपटाला विरोध करणारे ट्विट केले आहे. या चित्रपटातील शाहिद कपूरचे ‘मेल डॉमिनेटींग’ पात्र आवडले नाही.
Didn’t notice the deeply misogynistic & patriarchal narrative? Just intense acting? That is truly deeply disturbing. That you are the the chairperson of the @NCWIndia , makes me wonder about what we can hope for when it comes to women’s place in #India . 🔴 https://t.co/zxcLWVFuiO
— SONA (@sonamohapatra) June 21, 2019
‘कुणाचेही या चित्रपटातील महिला विरोधी कथानकाकडे लक्ष गेले नाही? फक्त इंटेन्स अॅक्टिंग? हे खरोखरचं व्यथित करणारे आहे. तुम्ही तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आहात. भारतात महिलांच्या सद्यस्थितीबद्दल काय अपेक्षा कराव्यात, हेच मला कळत नाही,’ असे ट्विट तिने केले.
& how can we keep such deeply disturbing , dark & dangerous politics ‘aside’? Does the actor have no responsibility for choosing to play a part in a narrative that can set us back as a society? Is that all we have become? Creatures of ambition? #LetsTalk #India#KabirSinghhttps://t.co/UxUbWdOpAF
— SONA (@sonamohapatra) June 21, 2019
यानंतर अभिनेता नकुल मेहताच्या ट्विटला उत्तर देतानाही तिने ‘कबीर सिंग’बद्दलचा राग व्यक्त केला. ‘एका कलाकाराला भूमिका निवडण्यापूर्वी जबाबदारीचे भान असायला नको का?’ असा संतप्त सवाल तिने केला.
अद्याप शाहिद कपूरने सोनाच्या या ट्विटचे उत्तर दिलेले नाही. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तो यावर बोलला होता. कलाकारांकडून कायम आदर्शवादी राहण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. समाजाचा एक दुसरा चेहराही चित्रपटाच्या माध्यमातून समोर यायला हवा, असे त्याने म्हटले होते.
सोना मोहपात्रा कायम तिच्या ट्विटमुळे चर्चेत असते. यापूर्वी तिने सलमान खानला असेच लक्ष्य केले होते. काही दिवसांपूर्वी तिने सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटावरही आक्षेप नोंदववला होता. ‘भारत’चे शूटींग संपल्याचे ट्विट सलमानने केले होते. हे ट्विट सोनाच्या टाईमलाईवरही झळकले होते. पण हे ट्विट पाहून सोना जाम भडकली होती. इतकी की, या व्यक्तिचे ट्विट माझ्या टाईमलाईनवर दाखवू नका, असे तिने ट्विटरवर जाहीर करून टाकले होते. काळवीट शिकार प्रकरणानंतर तिने सलमानवर उपरोधिक टीका केली होती. ‘आता वडील माफी मागणार का? आता या इंडस्ट्रीचं काय होणार? त्याला जामीन कधी मिळणार? त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा कधी प्रदर्शित होणार? चॅरीटी कार्यक्रम, दबंग कॉन्सर्ट, बिग बॉसच्या तारखा काय असतील?’, असे उपरोधिक ट्विट तिने केले होते.