त्याच्यासाठी सोनाक्षी आई-वडिलांना दुखावणार?
By Admin | Published: December 30, 2016 03:39 PM2016-12-30T15:39:23+5:302016-12-30T16:14:48+5:30
फरहान अख्तरसोबत लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा कपूरला शक्ती कपूरने फरफटत घरी नेल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगलेली असतानाच बॉलीवूडमधील अजून एक अभिनेत्री आईवडलांन दुखावून
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - फरहान अख्तरसोबत लिव्ह इनमध्ये राहत असलेल्या श्रद्धा कपूरला शक्ती कपूरने फरफटत घरी नेल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगलेली असतानाच बॉलिवूडमधील अजून एक अभिनेत्री आईवडिलांना दुखावून आपल्या प्रियकराशी साखरपुडा करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून शत्रुघ्न सिन्हांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा आहे.
वडिलांसारख्याच बिनधास्त आणि सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि बंदी सजदेह यांच्या प्रेमप्रकरणाची गॉसिप बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून सुरू आहे. पण आता नव्या वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये सोनाक्षी बंटी सजदेहसह साखरपुडा उरकून घेण्याच्या तयारीत आहे. मात्र शॉर्टगन या नावाने प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांना ही सोयरिक अमान्य आहे. बंटीचे घटस्फोटीत असणे आणि दोघांच्या वयात असलेले मोठे अंतर ही त्याची कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
बंटी सजदेह हा सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या पत्नीचा भाऊ असून, सोनाक्षी आणि त्याच्यात 2012 पासून प्रेमप्रकरण सुरू आहे. मात्र सोनाक्षीने प्रसारमाध्यमांशी बोलताना नेहमीच त्याचे खंडन केले आहे. पण आता साखरपुड्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर सोनाक्षी आई-वडिलांचा विरोध झुगारून साखपुडा करते की ही प्रेमकहाणी संपुष्टात आणते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.