गजब! ही सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेट तर नाही ना? अभिनेत्रीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 12:36 PM2021-04-24T12:36:16+5:302021-04-24T12:42:49+5:30

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Sonakshi sinha physical transformation after work out in home photo goes viral | गजब! ही सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेट तर नाही ना? अभिनेत्रीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

गजब! ही सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेट तर नाही ना? अभिनेत्रीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोनाक्षी अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. अलीकडेच  सोनाक्षीने तिचे फोटो शेअर केलेत आहेत ज्यात ती खूपच स्लिम आणि फिट दिसत आहे. सोनाक्षीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतायेत. 

एकीकडे लॉकडाऊनमध्ये घर बसून वजन वाढते आहे तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हाने लॉकडाउनमध्येच आपलं वजन कमी केले आहे. एक्सरसाइजच्या माध्यमातून तिचा हा ट्रान्सफॉर्मेशन केला आहे. सोनाक्षी आपल्या फिटनेसवर बरीच मेहनत घेत असल्याचे यातून दिसतेय. 

सोनाक्षी सिन्हाने आपले फोटो शेअर करताना लिहिले की, 'जेव्हा आपल्यासाठी #WFH म्हणजे घरातच वर्कआऊट. या पोस्टमध्ये सोनाक्षीने तिची दोन लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती पोज देताना दिसत आहे तर दुसर्‍या फोटोमध्ये ती वर्कआऊट करताना दिसते आहे. दबंग सिनेमासाठी देखील तिने 30 किलो वजन कमी केले होते.

 

२०१९मध्ये सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ वर्षाच्या शेवटला रिलीज झाला. 2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग ३ असे चार सिनेमा रिलीज झाले.सोनाक्षीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती अजय देवगणच्या 'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.


 

Web Title: Sonakshi sinha physical transformation after work out in home photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.