Sonali Bendre Health : सोनाली बेंद्रेचे नवे लूक तुम्ही पाहिलेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:34 PM2018-09-05T13:34:48+5:302018-09-05T13:38:06+5:30
सोनाली बेंद्रे कॅन्सरशी लढतेय. पण सोनाली जराही खचलेली नाही. ती या आजाराला हिंमतीने सामोरी जातेय. तिच्या सोशल मीडिया पोस्ट हेच दर्शवणाऱ्या आहेत.
सोनाली बेंद्रे कॅन्सरशी लढतेय. पण सोनाली जराही खचलेली नाही. ती या आजाराला हिंमतीने सामोरी जातेय. तिच्या सोशल मीडिया पोस्ट हेच दर्शवणाऱ्या आहेत. सोनालीने स्वत: सोशल मीडियावर आपल्या आजारपणाची बातमी शेअर केली होती. यानंतर ती सतत चाहत्यांना आपल्या प्रकृतीबद्दलचे अपडेट्स देत आहे. सोनालीने पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. सोबत काही फोटोंचे कोलाजही. यात ती आपल्या लूक्सबद्दल बोलतेय.
अल पचीनोच्या एका सुंदर वाक्याने सोनाली बेंद्रेने आपल्या पोस्टची सुरूवात केलीय. ती लिहिते, ‘Vanity is my favourite sin... चांगले दिसणे कुणाला आवडत नाही. आपण कसे दिसतो, याचा आपल्यावर सायकॉलॉजिकल परिणाम होत असतो. कुणी विग घालतो, कुणी ब्राईट रेड लिपस्टिक लावून मिरवतं किंवा कुणी हायहिल्स घालतं, तुम्हाला कुठली गोष्ट आनंद देते, हे महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी काय वाईट आहे, काय चांगले आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. मी विग टेस्ट देत असताना, मी सुंदर दिसू इच्छिते का? असा एक प्रश्न मी स्वत:लाचं विचारला. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा एक भाग असल्यामुळे तुम्ही सुंदर दिसावे, ही अपेक्षा असते. कदाचित म्हणून मलाही सुंदर दिसण्याची इच्छा झाली असावी. पण क्षणभर विचार केल्यावर, मी स्वत:साठी सुंदर दिसू इच्छिते, असे मला जाणवले. मला स्कार्फ घालायचा आहे तर मी तेच करणार. मला स्कार्फ नको असेल तरीही मी फ्री आहे. तुम्हाला स्वत:ला काय चांगलं दिसतं, काय आवडतं, हेच केवळ तुम्हाला कळायला हवं, त्यामुळे प्रत्येक क्षण जसा येतो, तसा येऊ द्या. प्रकाशाकडे बघा, किमान दिवसातून एकदा तरी...’असे सोनालीने लिहिले आहे. आपल्या पोस्टच्या शेवटी सोनालीने प्रियांका चोप्राचे आभार मानले आहेत. प्रियांकाने सोनालीची हेअर स्टाईलिस्टशी संपर्क भेट घालून दिली.