सोनम कपूरने कोव्हिड 19 लसीबद्दल विचारला प्रश्न; युजर्स म्हणाले, तुझ्या फोनमध्ये गुगल नाही का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 04:16 PM2021-02-25T16:16:36+5:302021-02-25T16:17:08+5:30
सोनमला ख-या मार्गदर्शनाची, उत्तराची अपेक्षा होती. पण झाले भलतेच. सोनम ट्रोल झाली.
अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट तर विचारू नका. या पोस्टमुळे ती अनेकदा ट्रोल होते. आता ही अशाच एका पोस्टमुळे सोनम ट्रोल होतेय. या पोस्टमध्ये सोनमने लिहिले तर कोव्हिड 19 लसीबद्दल प्रश्न विचारला. तिच्या प्रश्न विचारायची देर की, लगेच ती युजर्सच्या निशाण्यावर आली.
‘आपले आजी-आजोबा, आई-बाबांना भारतात कोव्हिड 19 लस कशी मिळेल, कुणी मला सांगू शकेल का? ही लस कुठे उपलब्ध आहे? मी खूप कन्फ्युज आहे. प्रत्येकाकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहे. मला खरंच याबद्दल माहिती हवी आहे,’ अशी पोस्ट सोनमने केली.
या पोस्टनंतर सोनमला ख-या मार्गदर्शनाची, उत्तराची अपेक्षा होती. पण झाले भलतेच. सोनम ट्रोल झाली. अनेकांनी तिला सरकारी साईटवर जाऊन बघण्याचा सल्ला दिला.
काहींनी तिला बातम्या पाहण्याचा, वृत्तपत्र वाचनाचाही सल्ला दिला. काहींनी तर तुझ्याकडे गुगल नाही का? असा उपरोधिक सवाल केला. आम्हाला का छळतेय, त्या नताशा पूनावालाला विचार, असेही काहींनी तिला सुनावले.
2018 मध्ये सोनमने आनंद आहुजाशी लग्न केले. आनंद आहूजामुळे जास्त चर्चेत असते.आनंदही व्यवसाय जगतात एक मोठे नाव आहे. रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वषार्ला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.
सध्या ती तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. कधी मुंबईत तर कधी लंडन ती ये-जा करत असते. मुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही.