सोनम कपूरच्या सासऱ्यांनी लंडनमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती माहितेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 04:55 PM2024-09-13T16:55:34+5:302024-09-13T16:56:31+5:30

सोनम ही पती आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत लंडनमध्ये नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.

Sonam Kapoor Father In Law Harish Ahuja Buys 226 Crore Property In London | सोनम कपूरच्या सासऱ्यांनी लंडनमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती माहितेय?

सोनम कपूरच्या सासऱ्यांनी लंडनमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती माहितेय?

बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर (sonam kapoor) कायमच तिच्या हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत येत असते. कोणतीही फॅशन ती बिनधास्तपणे कॅरी करते. गेल्या काही काळात सोनम कपूरचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. सोनम कपूर भलेही मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते.  सोनम ही पती आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत लंडनमध्ये नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.


सोनमचे सासरे हरीश आहुजा यांनी नॉटिंग हिल येथील एका आलिशान घरासाठी 27 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 226 कोटी रुपये मोजले आहेत. सोनम कपूरचे सासरे हरीश यांनी जुलैमध्ये आठ मजली निवासी कॉन्व्हेंट खरेदी केलं आहे. यूकेमध्ये नोंदणीकृत दस्तऐवजानुसार त्यांचा मुलगा आनंद आणि सून सोनम यांच्या लंडनमधील घराच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ते या नव्या आठ मजली घरात राण्यासाठी येण्याच्या विचारात आहेत. या इमारतीचा वेगळा भाग फ्लॅटमध्ये बदलला जाण्याची शक्यता आहे.


ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ही मालमत्ता 20 हजार स्क्वेअर फूटपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेली आहे. हे केन्सिंग्टन गार्डनपासून थोड्या अंतरावर आहे. सोनमचे सासरे हरीश आहुजा हे मोठे व्यवसायिक आहेत. सोनम खूपच आलिशान आयुष्य जगते हे आपण अनेकदा पाहिलंच आहे. लंडन, दिल्लीत तिचं आलिशान घर आहे. तर मुंबईतही वडील अनिल कपूरचं कपूर हाऊस महलपेक्षा कमी नाहीए.
 

Web Title: Sonam Kapoor Father In Law Harish Ahuja Buys 226 Crore Property In London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.