अनिल कपूरची लेक रिया कपूरला जीवे मारण्याची धमकी, संतापली बहिण सोनम कपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 11:18 AM2020-07-01T11:18:00+5:302020-07-01T11:19:51+5:30
जाणून घ्या काय आहे प्रकरण
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत असते. सध्या ती नेपोटिजमच्या मुद्यावरून चर्चेत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा वाद ऐरणीवर आला आहे. अशात बॉलिवूडचे अनेक स्टार किड्स सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूरही त्यापैकी एक़ हीच सोनम सध्या जाम संतापली आहे. सोनम यापूर्वीही अनेकदा ट्रोल झाली आहे. पण कधीच ती इतकी संतापली नव्हती. याचे कारण म्हणजे, तिची बहिणी रियाला इन्स्टाग्रामवर मिळालेली जीवे मारण्याची धमकी.
होय, सोनमची बहिण रिया हिला नेपोटिझमच्या मुद्यावरून इन्स्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यात. रियाने लगेच इन्स्टाग्रामकडे याबद्दलची तक्रार नोंदवली. धमकी देणा-या लोकांविरोधात कारवाईची मागणी तिने केली. मात्र इन्स्टाग्रामने अशा लोकांना अनफॉलो, म्यूट वा ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. यावर रिया संतापली. सोनम कपूर तर जाम भडकली. तिने रियाला मिळत असलेल्या धमक्यांचे स्क्रिनशॉट्स शेअर करत इन्स्टाग्रामला चांगलेच फैलावर घेतले. ‘इन्स्टाग्रामला जीवे मारण्याची धमकी देणे गाइडलाइन्सचे उल्लंघन वाटत नाही. कदाचित त्यांच्या टीमला हिंदी समज नसावी,’ अशा शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.
रिया म्हणाली,
जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची तक्रार केल्यानंतरही इन्स्टाग्रामने ही तक्रार गंभीरपणे न घेतल्याने रिया सुद्धा संतापली. तिनेही इन्स्टाग्रामला सुनावले.
‘इन्स्टाग्राम खरचं? एकदा कमेंट पाहा. एकदा नाही तर अनेकदा मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मी धमकी देणा-याला ब्लॉक करेलही. पण कम्युनिटीला सुरक्षित ठेवण्याचे तुमचे कर्तव्य बजावत आहात? विनाकारण हेटफुल कमेंट करणाºयांना ब्लॉक करून मी आनंदी आहे. पण जीवे मारण्याची धमकी देणे तुमच्या कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन नाही, असे तुम्ही म्हणत आहात, ते पाहून मला संताप येतोय,’ असे तिने इन्स्टाग्रामला सुनावले.