जेव्हा रेड कार्पेटवर दिसतो सोनमचा जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2017 03:13 AM2017-01-21T03:13:14+5:302017-01-21T03:13:14+5:30

बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूर ओळखली जाते

Sonam's flute appears on red carpet | जेव्हा रेड कार्पेटवर दिसतो सोनमचा जलवा

जेव्हा रेड कार्पेटवर दिसतो सोनमचा जलवा

googlenewsNext


बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. जेव्हा-जेव्हा सोनम वेगवेळ्या लूकमध्ये रेड कार्पेटवर येते, तेव्हा साऱ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त सोनम कपूरकडेच वळलेल्या दिसतात. नुकतेच एका अ‍ॅवॉर्ड शोमध्ये सोनम काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. त्या वेळी पुन्हा एकदा सोनम कपूरही स्टाइल आयकॉन का आहे, याची प्रचिती आली. तिचा ड्रेसिंग सेन्स, तिची हेअर स्टाइल, स्टायलिश अ‍ॅक्सेरीजमध्ये ती अतिशय बोल्ड आणि बिनधास्त मिरवताना दिसते. तिने घातलेला गाऊन असो किंवा इतर कोणत्या स्टाइलचे कपडे, प्रत्येक आउटफिटमध्ये सोनम खूप कम्फर्ट दिसते. तिचा प्रत्येक आउटफिट ती खूप कॉन्फिडन्सने कॅरी करत असल्यामुळे तिचा हाच अंदाज साऱ्यांनाच भावतो. म्हणून एक स्टाइल आयकॉन म्हटल्यावर सगळ्यात आधी सोनम कपूरचे नाव पुढे येते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Sonam's flute appears on red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.